Share

कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात गैरप्रकार सुरूच; शिपायानेच कैद्यांना पुरविला गांजासदृश पदार्थ

Published On: 

कोल्हापूर : कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात कैद्यांकडे मोबाईल, गांजा सापडलेले प्रकरण राज्यभर गाजले असतानाच, बुधवारी पुन्हा कारागृहात आणखी एक प्रकरण चव्हाट्यावर आले आहे. कारागृहात सुरक्षेसाठी नेमलेल्या शिपायानेच तिघा शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांना गांजासदृश पदार्थ पुरवल्याचे उघड झाले आहे.

याप्रकरणी कारागृहातील तपासणी पथकाला चौघांकडे गांजासदृश अमली पदार्थ व १५०० रु. ची रोकड मिळाली. शिपायासह एकूण चौघांवरही रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. यामध्ये इंद्रजित पाचुराम बलोटीया, छेदीलाल ऊर्फ शिवा रामलाल निर्मळ, सुबोध प्रसाद ऊर्फ अनिल ऊर्फ छोटू जगदीश मेहता अशी तिघा कैद्यांची तर, शिपाई सतीश दगडू गुंजाळ (सर्व रा. कळंबा कारागृह) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत. गांजासदृश अमली पदार्थाच्या ३ ग्रॅम ५६ मिली वजनाच्या छोट्या आठ पुड्या व १५०० रुपये विशेष पथकाने जप्त केले.

कळंबा कारागृहात काल तुरुंगाधिकारी महादेव होरे हे कर्तव्य बजावत होते. तेव्हा या त्यांना कैद्यांकडून काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यामुळे कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदूरकर यांनी नेमलेल्या विशेष पथकाने शिक्षा भोगणाऱ्या तिघा कैद्यांसह कारागृहातील शिपाई यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे गांजासदृश अमली पदार्थाच्या छोट्या-छोट्या आठ पुड्या व पैसे मिळून आले. चौघांवर बुधवारी रात्री उशिरा जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सतीश गुंजाळ हा गांजासदृश पदार्थ बाहेरून कारागृहात आणून कैद्यांना पुरवत असल्याची माहिती कैदी छेदीलाल ऊर्फ शिवा निर्मळ यांनी कारागृहातील तपासणी पथकास दिली.तिघेही कैदी खून प्रकरणातील आरोपी आहेत.विविध ठिकाणी खून केल्याप्रकरणी कारागृहात शिक्षा भोगत आहेत. या कैद्यांवर पोलीस कारवाई करतीलच; पण शिपायाकडून असे गैर कृत्य घडणे गंभीर आहे,संबंधित शिपायाबाबत खातेनिहाय चौकशीबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवू असे अधीक्षक इंदूरकर यांनी यावेळी सांगितले.

कळंबा मध्यवर्ती कारागृहात बऱ्याच गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षा भोगत आहेत. गेल्या सहा-सात महिन्यांत कारागृहाबाहेरून गांजा, मोबाईल आतील कैद्यांना पुरविल्याच्या तसेच कारागृहात त्याचा वापर झाल्याच्या घटना चव्हाट्यावर आल्या आहेत. त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण झाला होता. या प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून गंभीर दखल घेण्यात आली होती. त्याप्रकरणी काही कैद्यांसह एकूण आठजणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली आहे. हे प्रकरण अद्याप ताजे असतानाच बुधवारी सकाळी पुन्हा ही घटना घडल्याने कळंबा कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!