Share

चिन्यांच्या कुरापती सुरूच; सीमेजवळील भागात पुन्हा एकदा बांधकाम केलं सुरु

Published On: 

नवी दिल्ली : भारतावर कुरघोडी करणं ही चिनी ड्रॅगनची जुनीच सवय आहे. गेल्या वर्षभरापासून भारत आणि चीन मध्ये संघर्ष वाढला होता. कोरोना काळात देखील चीनने भारतीय भूभागात घुसखोरी करण्याचे अनेक प्रयत्न केले होते. यावेळी दोन्ही देशाचे सैन्य एकमेकाला भिडलं देखील होतं. यात भारताचे २० जवान शहिद झाले होते. तर, याहून दुप्पट चिनी सैनिकांना भारतीय फौजेने यमसदनी धाडलं होतं.

यानंतर, दोन्ही देशांमध्ये चांगलाच संघर्ष वाढला होता. याचा परिणाम जागतिक पातळीवर देखील होत होता. तर, दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांमध्ये सुमारे १२ हुन अधिक चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर प्रत्यक्ष सीमेवरून सैन्य माघारी घेण्यावर तडजोड झाली होती. मात्र, आता अवघ्या काही महिन्यातच चीनचे काळे मनसुबे समोर आले आहेत.

आता चीननं सीमेजवळ पुन्हा एकदा बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. लाइन ऑफ ऍक्चुअल कंट्रोलजवळील सिक्किम, पूर्व लडाखमध्ये स्थायी बांधकाम करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे पुन्हा एकदा तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. चीनी सैनिक भारतीय सीमेजवळ ठाण मांडून बसण्यासाठी तयारी करत असल्याचं यातून दिसत आहे. उत्तर सिक्किमच्या नकुल भागापासून काही किलोमीटर अंतरावर हे बांधकाम सुरु आहे. याच भागात भारतीय जवान आणि चीन सैनिकांमध्ये झडप झाली होती. चीनी सैनिकांना थंडीपासून संरक्षण मिळावं तसेच आवश्यकता असल्यास चाल करण्यासाठी हे बांधकाम केलं जात आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!