मुंबई : यूजीसी अर्थात विद्यापीठ अनुदान आयोगाने इतिहासाच्या पदवीपूर्वी अभ्यासक्रमातून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुघलांचा इतिहास वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यूजीसी ने घेतलेल्या या निर्णयात पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या इतिहास विषयात अकबर आणि मुघलांपेक्षा राणा प्रताप, सम्राट विक्रमादित्य यांच्यावर अधिक प्रकाश टाकण्यात येणार आहे.
इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमाचा नवा आराखडा ‘यूजीसी’ने बनवला आहे. त्यात हिंदुस्थानच्या समृद्ध इतिहासात आक्रमणे करून येथील संस्कृती उद्ध्वस्त करणाऱया मुस्लिम आक्रमकांना जागा देण्यात आलेली नाही. ‘हिस्ट्री ऑफ इंडिया (1206 ते 1707)’ या शीर्षकाखाली सांगितल्या जाणाऱया इतिहासात अकबर आणि मुघल यांना वगळून राणा प्रताप आणि हेमू विक्रमादित्य या हिंदू राज्यकर्त्यांचा पराक्रम अधोरेखित करण्यात आला आहे.
दरम्यान यावर आता इतिहासाची तोडफोड करण्याचा, तो लपवण्याचा ‘यूजीसी’चा हा प्रयत्न असल्याची टीका होऊ लागली आहे. जातीव्यवस्था आणि ती दूर करण्यासाठी झालेली सामाजिक आंदोलने यांना इतिहासात महत्त्व दिले गेले पाहिजे, असे मत विचारवंतांनी व्यक्त केले आहे.
परंतु वसुधैव कुटुंबकम या संकल्पनेवर नवीन प्रस्तावित अभ्यासक्रम असणार आहे. या माध्यमातून पदवीपूर्वी विद्यार्थ्यांना धर्मांसंदर्भातील ज्ञान देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्राचीन भारतामधील विज्ञान आणि तंत्रज्ञानासंदर्भातील माहितीही या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- डॉ.नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणातील आरोपी विक्रम भावेला हायकोर्टाचा दिलासा, घेतला ‘हा’ निर्णय
- चिन्यांच्या कुरापती सुरूच; सीमेजवळील भागात पुन्हा एकदा बांधकाम केलं सुरु
- गर्दी टाळण्यासाठी पालिकेने लढवली शक्कल, औरंगाबादेत करवसुली केंद्रांमध्ये वाढ!
- ‘लग्नाला २३ वर्षे झाली’; पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीची भावूक पोस्ट
- गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतानाचे नाव देण्यास भाजपचा विरोध


