औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची तिजोरी रिकामी झालेली आहे. त्यामुळे विविध उपाययोजनांद्वारे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मनपाद्वारे विविध उपाय योजना केल्या जात आहेत. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी भरण्याची व्यवस्था प्रत्येक झोन कार्यालयात करण्यात आली आहे. परंतु कोरोनाची परिस्थिती लक्षात घेत गर्दी टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात पाच वसुली केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी एक वसुली केंद्र सध्या सुरू करण्यात आले आहे.
कर वसुलीचे प्रमाण वाढावे यासाठी पालिका प्रशासनातर्फे विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून एका झोन कार्यालयात पाच वसुली केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेचे प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांच्या निर्देशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालिकेचे उपायुक्त करनिर्धारक तथा संकलक अपर्णा थेटे यांनी दिली. वसूलीचे प्रमाण वाढविण्याबरोबरच एकाच केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोरोना काळात गर्दी टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक झोन कार्यालयाच्या क्षेत्रात पाच केंद्र सुरू केले जातील. त्यापैकी एक केंद्र सध्या सुरू करण्यात आले आहे. हे सर्व वसुली केंद्र झोन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली असणार आहेत. सर्व वसुली केंद्र कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत सुरू ठेवली जाणार आहेत. नागरिकांनी या ठिकाणी मालमत्ता कर, पाणीपट्टीचा भरणा करावा असे आवाहन थेटे यांनी केले आहे.
याठिकाणी भरु शकता कर :
वॉर्ड क्रमांक १७ नंदनवन कॉलनी महापालिका शाळा, वॉर्ड क्र. ५५ , भवानी नगर जुने झोन कार्यालय, मनपा आरोग्य केंद्राजवळ, वॉर्ड क्र. २५ , गणेश कॉलनी महानगरपालिका प्राथमिक शाळा, वॉर्ड क्र. ४ ,चेतना नगर महानगरपालिका शाळा, वॉर्ड क्र. ३९, अयोध्यानगर एन-७ मनपा शाळा, वॉर्ड क्र. ८९ चिकलठाणा महानगरपालिका शाळा, वॉर्ड क्र. ६५, सुराणानगर सेव्हन हिल अग्निशमन केंद्र, वॉर्ड क्र १०६, कांचनवाडी
महानगरपालिका शाळा, वॉर्ड क्र १०४ , बन्सीलालनगर महानगरपालिका शाळा.
महत्त्वाच्या बातम्या
- गोवंडी येथील उद्यानास टिपू सुलतानाचे नाव देण्यास भाजपचा विरोध
- …अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात पंढरपूर पॅटर्न राबविण्यासाठी वारकरी रस्त्यावर उतरेल – विश्व हिंदू परिषद
- ‘मुंबई विमानतळावर ‘आवाज’ हा मराठी माणसाचाच असेल’, मनसेचा इशारा
- राज्यातील पर्यटन विकासासाठीच्या तब्बल २५० कोटी निधीचे वितरण करा; अजित पवारांचे निर्देश
- ‘मुख्यमंत्र्यांना घरातच बसून राहायचे आहे त्यामुळे ते निर्बंध उठवत नाहीत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

