Share

‘लग्नाला २३ वर्षे झाली’; पतीच्या आठवणीत मंदिरा बेदीची भावूक पोस्ट

Published On: 

मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदीचे पती राज कौशल यांचे ३० जूनला हृदयविकाराच्या झटक्यामुळे निधन झाले. यामुळे मंदिरा आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. राज कौशल यांच्या निधनाची बातमीमुळे बॉलिवूडमध्ये देखील शोक व्यक्त केला. पतीच्या निधनानंतर ती सोशल मिडीयावर पोस्ट शेअर करत असल्याचे पाहायला मिळते. आता पुन्हा एकदा तिने पतीच्या आठवणीत एक पोस्ट शेअर केली आहे.

https://www.instagram.com/p/CRT1MBcFg42/?utm_source=ig_web_copy_link

इन्स्टाग्रामवर पतीसोबतचे काही फोटो शेअर करत तिने म्हटले की, ’25 वर्षे एकमेकांना ओळखून आणि लग्नाला 23 वर्षे झाली… पोस्ट शेअर करत पुन्हा मंदिरा पतीच्या आठवणीत भावूक झाली. मंदिराची ही पोस्ट वाचून चाहते देखील दु:खी झाले. अनेकांनी कमेंट करत तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे.

काही दिवसापूर्वीच मंदिराने सोशल मीडियावर राज कौशलच्या आठवणीत भावूक पोस्ट केली होती. नुकतेच मंदिरा बेदीने सोशल मीडिया ट्विटरवर नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, RIP माझा राजी. यासोबतच तिने हृदय तुटणारी इमोजी टाकला आहे. अनेकांनी या पोस्टवर दु:ख व्यक्त केले होते.

राज कौशल यांनी अभिनेता म्हणून त्यांच्या करिअरची सुरुवात केली होती. ‘प्यार में कभी कभी’, ‘शादी का लड्डू’ और ‘एंथनी कौन है’ या सिनेमांचं त्यांनी दिग्दर्शन केले. १९९९ साली मंदिराने दिग्दर्शक आणि निर्माते असलेल्या राज कौशल यांच्याशी लग्नगाठ बांधली होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!