Share

कडवंची हे पाणलोट विकासाचे आदर्श मॉडेल : कुलगुरू डॉ. अशोक ढवण

Published On: 

🕒 1 min read

जालना : कडवंची हे पाणलोट विकासाचे आदर्श मॉडेल असल्याचे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरु डाॅ. अशोक ढवण यांनी व्यक्त केले. कडवंची हे गाव सहाय्य मंडळ तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या संयुक्त विद्यमाने विकसीत केलेले आहे. येथील पाणलोट क्षेत्राची नुकतीच पाहणी कुलगुरु डाॅ. अशोक ढवण यांनी केली.

कुलगुरु यांनी कडवंची येथील शेतकऱ्यांची बदललेली पीक पद्धती, शेतकऱ्यांचे उंचावलेले जीवनमानाबाबत माहिती देखील घेतली. कडवंचीचे एकुण पाणलोट क्षेत्र १८०० हेक्टर आहे. तर माती आणि जलसंधारणाच्या माध्यमातून सुपीक असलेली माती वाहून जाण्याची थांबली आहे. तर येथील जमिनीती सेंद्रीय कर्बाचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान या मुळे पिकांच्या उत्पादकतेत वाढ झाली आहे. आज तेथे पीक पद्धतीत बदल झाला आहे. द्रांक्ष, डाळींब, सीताफळ, पेरु, कांदा, भाजीपाला या सारखी पीके उपचार पद्धतीचा समावेश शासनाच्या कृषी विभागाव्दारे एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमामध्ये केला असल्याचे माहिती घेतली.

संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श ठरलेल्या कडवंची येथे डॉ. ढवण यांनी भेटीदरम्यान प्रकल्पाची माहिती घेतली. या वेळी पाणलोटाचे विविध उपचार जसे की, बांधबस्ती, सीसीटी,वनीकरण, सिमेंट नालाबांध यांना भेटी देवून  सर्व माहिती जाणून घेतली. तसेच या प्रकल्पावर आधारीत परिसरातील शेतकऱ्यांनी आदर्श घेवून स्वत:च्या गावामध्ये असे बदल कसे करता येतील याचा विचार करुन कामाला लागले पाहीजे, असेही मत या वेळी त्यांनी व्यक्त केले.

महत्त्वाच्या बातम्या

 

 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!