Share

के. चंद्रशेखर राव यांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट; तेजस ठाकरेंची उपस्थिती चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज (२० फेब्रुवारी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. (K. Chandrashekhar Rao met Chief Minister Thackeray) यावेळी मुख्यमंत्र्यांसोबतच त्यांचे सुपुत्र तेजस ठाकरे (Tejas Thackeray) यांचीही उपस्थिती होती. त्यामुळे याचीच चर्चा अधिक होत असल्याचे दिसून येत आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली. त्याचदिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिल्ली वारी केली. तर लगेच दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करत भेटीला येण्याचे निमंत्रण दिले होते. त्यामुळे या भेटीच्या चर्चा अधिक रंगल्या होत्या. आज अखेर दोन्ही मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मात्र यांच्यात नेमकी काय चर्चा झाली. हे अजून स्पष्ट झाले नाही.

काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर राव यांनी पाकिस्तानवर करण्यात आलेल्या कारवाईच्या पुराव्याची मागणी केली होती. दरम्यान बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच नवी दिल्लीत बैठक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनीही सहमती दर्शवली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी, तमिळनाडूचे स्टॅलिन, तेलंगणचे चंद्रशेखर राव या प्रादेशिक पक्षांच्या मुख्यमंत्र्यांची एकजूट होण्याची चित्रे सध्या दिसून येत आहे. त्यात आजची भेट याला नवे वळण देऊ शकते, असे म्हटले जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!