🕒 1 min read
अमरावती: राज्यात गेल्या काही महिन्यांपासून भाजप आणि शिवसेना यांच्यात चांगलेच राजकारण तापत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात झालेले आरोप प्रत्यारोप तर सर्वांना माहीत आहेतच. सामान्य जनतेच्या प्रश्नावर सध्या राजकारण होत नसून वयक्तिक पातळीवरचं हे राजकारण सुरू आहे. त्यात आणखी भर पडतच आहे.
राज्याचे कृषी मंत्री व शिवसेना नेते दादा भुसे (Dada Bhuse) हे अमरावतीच्या दौऱ्यावर असून शिवसेनेचा पश्चिम विदर्भ मेळावा होत आहे. राज्य सरकारने महत्त्वाची कामे केलीत ते काम शेतकऱ्यांपर्यंत पोहचली पाहिजे तसेच नवी ऊर्जा शिवसैनिकांमध्ये निर्माण झाली पाहिजे यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, असं दादा भुसे म्हणाले.
पुढे बोलताना दादा भुसे म्हणाले, शिवसेनेला (Shivsena) हिंदुत्व शिकवण्याची गरज नाही, जेव्हा वेळ येते तेव्हा कृतीतुन हिंदुत्व दाखवण्याची गरज असते त्यामुळे शिवसेनेला कोणी हिंदुत्व शिकवू नये. शिवसैनिकाच्या रक्तात हिंदुत्व आहे, अशी प्रतिक्रिया दादा भुसे यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या:
-
‘आपल्याच देशात भगवद् गीतेच्या पठणाला विरोध…’; आमदार नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख; अतुल लोंढे भाजप मंत्र्यावर संतापले
-
‘शिवरायांच नाव घेऊन शिवसेना राजकारण करत आहे’; पूनम महाजन यांचा आरोप
-
“मराठी भाषा गौरव दिन जेवढा भव्य करता, तेवढा करा”, मनसेचे आवाहन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
