Share

“इथं न्याय होणार! ही महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई, बंडाविरुद्ध बंड होणार”, रुपाली पाटलांची प्रतिक्रिया

Published On: 

मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दारु पितात, असे खळबळजनक वक्तव्य ज्येष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर ( Bandatatya Karadkar) यांनी ३ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारच्या वाईन विक्री निर्णयाविरोधात करण्यात आलेल्या आंदोलनात केले होते. त्यानंतर बंडातात्यावर साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रुपाली पाटील ट्विट करत म्हणाल्या, ‘इथं न्याय होणार! खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde ) यांच्याविषयी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याबद्दल बंडा कराडकर यांच्या विरुद्ध रात्री उशीरा पुणे येथे गुन्हा दाखल केला. लवकरच त्यांना नोटीस मिळेल. ही महिलांच्या आत्मसन्मानाची लढाई बंडाविरुद्ध बंड होणार’, असे ट्विट रुपाली पाटलांनी केले आहे.

राज्य सरकारच्या वाईनविक्री निर्णयाविरोधात ३ फेब्रुवारी ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने दंडवत दंडुका आंदोलन करण्यात आले. यावेळी कराडकर यांनी राज्यातील नेते आणि त्यांची मुले रस्त्यावर दारू पिऊन पडतात. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे या दारु पितात असा आरोप केला. याविरोधात बंडातात्या कराडकर यांच्याविरोधात बेकायदेशीर आंदोलन, कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन तसेच भडकाऊ भाषण केल्याच्या कारणाने सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!