मुंबई: राष्ट्रवादीच्या नेत्या आणि पुण्यातील माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे-पाटील यांनी काल (बुधवारी) एक व्हिडीओ शेयर करत, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर चांगलीच टीका करत समाचार घेतला. आपल्या व्हिडिओ क्लिपमध्ये त्यांनी वाहिनी तुम्ही स्वतःला आवारा, साहेब आवरत नसतील तर तुम्ही स्वतःला सावरा, अन्यथा तुमच्यावर मानसिक परिणाम होतील व तुम्हाला त्यावर उपचार घ्यावे लागतील. असे अनेक सल्ले दिले. पाटलांचा हा व्हिडिओ प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडियावर भरपूर व्हायरल झाला.
आता, रुपाली पाटील-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केलेल्या टिकेनंतर भाजप आमदार श्वेता महाले यांनी रुपाली पाटील-ठोंबरे यांना जोरदार चपराक दिली आहे. भाजप आमदार श्वेता महाले बोलताना म्हणाल्या, परवा राष्ट्रवादीमध्ये आलेल्या रुपाली-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे रुपाली पाटील ठोंबरे यांची वैचारिक पातळी काय आहे हे दिसून येते.
रुपाली पाटील स्वतः महिला आहेत आणि एका महिलेबद्दल असे बोलतात आणि दुसऱ्यांना ज्ञान शिकवतात म्हणत, रूपाली पाटील-ठोंबरे यांना टोला लगावला. देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला आवरण्यापेक्षा रूपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांच्याच पक्षातील मंत्री धनंजय मुंडे आणि मेहबूब शेख यांना आवरलं तर बरं होईल अशी खोचक प्रतिक्रिया दिली. एक महिलाच दुसऱ्या महिलेवर अशी टीका करते याची खंत वाटते असेही त्या म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या:
- “सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात”; बंडातात्या कराडकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
- असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर यूपीत गोळीबार
- …तर सुप्रिया सुळे यांनी माझे आव्हान स्वीकारावे – किर्तनकार बंडातात्या कराडकर
- “सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे दारू पितात”; बंडातात्या कराडकर यांचे वादग्रस्त वक्तव्य
- पुण्यातील भिडे पुल होणार इतिहासजमा, जाणून घ्या कारण…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

