उत्तर प्रदेश: सध्या उत्तर प्रदेशच्या निवडणूका (Uttar Pradesh Elections) तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे भाजप पक्ष तिथे जोरदार प्रचार करताना दिसत आहे. भाजप सोबतच इतर पक्ष देखील चांगलेच निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. भाजप साठी मात्र उत्तर प्रदेश एक महत्वाचे राज्य असल्याने पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) तसेच गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) इथल्या निवडणुकीत जातीने लक्ष देत असल्याचे दिसत आहे.
गृहमंत्री अमित शाह उत्तर प्रदेशमधल्या अनुपशहर येथे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जाहीर सभा घेतली होती. यावेळी राज्यातील माफिया बद्दल बोलताना शाह म्हणाले, आज संपूर्ण उत्तर प्रदेशातील एकाही माफियामध्ये काहीही चुकीचे करण्याची हिंमत नाही. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या राजवटीत माफियांचे पलायन झाले आहे. उत्तर प्रदेशातील माफिया आता फक्त तीन ठिकाणी आहेत. राज्याबाहेर, तुरुंगात किंवा अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांच्या यादीत आमदार होण्यासाठी उत्सुक. आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी माफियांना सरळ करण्याचे काम केले आहे, असं शाह म्हणाले.
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले, मला खात्री आहे की, यावेळीही उत्तर प्रदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली योगी आदित्यनाथ दोन तृतीयांश बहुमताने मुख्यमंत्री बनणार आहेत, असा दावा यावेळी शाह यांनी केला आहे. तसेच भाजपाने (BJP) उत्तर प्रदेशचा कायापालट करण्याचे काम केले आहे. पंतप्रधान मोदींनी देश सुरक्षित करण्याचे काम केले आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे सरकार आल्यास तर मोदींचे हात बळकट होतील, असा दावा त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या:
रूपाली पाटील-ठोंबरे यांची वैचारिक पातळी काय ? – श्वेता महाले
१० फेब्रुवारी पासून सुरु होणार भारतातील बहुचर्चित क्रिकेट स्पर्धा…
‘राहुल गांधींना दोन भारत दिसतात कारण त्यांची आई…’; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची टीका
समांथाच्या Tattoo शी नागा चैतन्यचं खास कनेक्शन, नातं तुटलं मात्र…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

