🕒 1 min read
कोरोनामुळे (Corona) पुढे ढकलण्यात आलेले रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा नवा सीजन लवकरच सुरु होणार आहे अशी माहिती आज बीसीसीआयने दिली आहे. रणजी करंडक स्पर्धेची (Ranji Trophy 2022) साखळी फेरी 10 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. बीसीसीआयने रणजी स्पर्धेच्या सुधारीत कार्यक्रमाची आज घोषणा केली आहे. गेल्या दोन वर्षात देशात कोरोनाने घातलेल्या हाहाकाराने बीसीसीआयला रणजी स्पर्धा स्थगित करावी लागली होती. या वर्षी काही झालं तरी मी देशांर्गत रणजी स्पर्धा भरवणारच असे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते.
या २०२२ मोसमाची रणजी स्पर्धेची सुरुवात 13 जानेवारीला होणार होती. मात्र ओमायक्रॉन ने देशभरात धुमाकूळ घालायला सुरुवात केल्यावर रणजी स्पर्धा बीसीसीआयने पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. आता ही बहुचर्चित रणजी स्पर्धा १० फेब्रुवारी पासून सुरु होणार आहे. कोरोनामुळे (Corona) पुढे ढकलण्यात आलेले रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेचा नवा सीजन लवकरच सुरु होणार आहे.
येत्या 10 फेब्रुवारीपासून रणजीचा मोसम सुरु होणार आहे. याबाबतीत बीसीसीआयने आज सर्व राज्य क्रिकेट संघांना याची माहिती दिली आहे. आयपीएलच्या आधी आणि नंतर अशा दोन टप्प्यांमध्ये रणजी स्पर्धेचं आयोजन करण्यात येईल, अशी माहिती आज बीसीसीआयने दिली आहे. पहिल्या टप्प्यात ग्रुप स्टेजचे सामने खेळवण्यात येणार आहेत , तर 30 मे पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात नॉकआऊटचे सामने होतील.
महत्वाच्या बातम्या :
- ‘राहुल गांधींना दोन भारत दिसतात कारण त्यांची आई…’; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची टीका
- समांथाच्या Tattoo शी नागा चैतन्यचं खास कनेक्शन, नातं तुटलं मात्र…
- भारतीय क्रिकेट संघातील दोन खेळाडूंची कारकीर्द धोक्यात??
- Board Exams: औरंगाबादेत शिक्षण संस्था महामंडळाचा दहावी-बारावी बोर्डांच्या परिक्षांवर बहिष्कार..!
- “बचावासाठी आरोपी इतरांची नावं घेत असतो..”; परमवीर सिंहाच्या खुलाशाला राऊतांचे प्रतिउत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
