नवी दिल्ली: महाराष्ट्र सरकारकडून वाईनला किराणा दुकानात विकण्याची परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयात शेतकऱ्यांचे हित आहे, असे महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र वाईनला किराणा दुकानात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय योग्य आहे का? यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. यात आता शेतकरी नेते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राजू शेट्टी म्हणाले की, ‘वाईनला किराणा दुकानात विक्रीची परवानगी देण्यात आली आहे. जसं किर्तनाने माणूस सुधारत नाही, ना तो लावणीने बिघडतो. तसं किराणा दुकानात विक्रीची परवानगी दिल्याने वाईनचा खप वाढणार नाही किंवा कमी होणार नाही. त्यामुळे हा विषय आता संपला पाहिजे. काही लोक जाणीवपूर्वक हा विषय चर्चेमध्ये आणत आहे. मात्र या सर्वांमधून शेतकऱ्यांची नाहक बदनामी सुरू आहे, म्हणून हे सर्व वेळीच थांबायला पाहिजे.’
यावेळी राजू शेट्टी यांनी पोलिसांच्या बदल्यावरून सध्याच्या सरकारवर जे आरोप होत आहेत, त्यावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या लोकप्रतिनिधींच्या सल्ल्यावरूनच होत असतात, याआधी त्या अनेकवेळा झाल्या आहेत. मात्र आता यामध्ये बदल झाला पाहिजे, पोलीस बदल्यांसाठी एक नियमावली निश्चित केली पाहिजे जेणेकरून हा बदल्यांचा धंदा बंद होईल, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. यावेळी शेतकरी आंदोलनावरून देखील शेट्टी यांनी भाजपावर टीका केली. ‘दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन यात ७०० पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, याला जबाबदार लोकांना शिक्षा झाली पाहिजे,’ अशी मागणी ही राजू शेट्टींनी केली.
महत्वाच्या बातम्या:


