Share

‘राहुल गांधींना दोन भारत दिसतात कारण त्यांची आई…’; राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपची टीका

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: बुधवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर लोकसभेत बोलताना राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली होती. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले होते, आता दोन भारत आहेत एक अतिशय श्रीमंतांचा भारत आणि दुसरा गरीबांचा. या दोन्ही भारतांच्या दरम्यानची दरी दिवसेंदिवस वाढत आहे, असं वक्तव्य राहुल गांधी यानं केलं होतं.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले होते, गेल्या सात वर्षात तुम्ही लघू आणि मध्यम उद्योगांवर आक्रमण केलंय. नोटाबंदी, त्यापाठोपाठ जीएसटी आणि करोनाकाळात त्यांना तुम्ही कोणतीच मदत केली नाही. लोकांच्या उत्पन्नात घट झाली असून गरीबांची संख्या वाढत आहे. युपीए सरकारने १० वर्षात २७ कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढलं होतं. मोदी सरकारने २३ कोटी लोकांना परत गरिबीमध्ये ढकललं आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

राहुल गांधी यांनी केलेल्या दोन भारतच्या व्यक्तव्यवरून भाजप (BJP) नेत्यानी जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे. हरयाणाचे गृहमंत्री अनिल विज (Anil Vij) यांनी देखील राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका केली आहे. अनिल विज म्हणाले, राहुल गांधींना एका भारतात दोन भारत दिसणे स्वाभाविक आहे. कारण ते दोन संस्कृतींमध्ये वाढलेले आहेत; त्यांच्या आई सोनिया गांधी इटालियन असून वडील राजीव गांधी हे भारताचे होते. त्यामुळे ते इटली आणि भारताच्या संस्कृतीत वाढले. परिणामी त्यांच्या विचारांमध्ये नेहमीच संघर्ष होत असतो, असं विज यांनी ट्विटमध्ये म्हणलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!