मुंबई : भाजपनं मराठा आरक्षणविरोधी लढ्याला रसद पुरवून मराठा समाजाशी दगाबाजी केली आहे,’ असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी नाव घेऊन भाजपवर आरोप केले आहेत. ‘आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे असा दिखावा करायचा आणि प्रत्यक्षात ते मिळू नये म्हणून मोहिमा चालवायच्या ही भाजपची कार्यपद्धती आहे.
सर्वोच्च न्यायालयात आरक्षणविरोधी लढाई लढणारे सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन या संस्थेचा संघाशी थेट संबंध आहे. या संस्थेतील बहुसंख्य विश्वस्त हे आरएसएसशी संबंधित असून नागपूरचेच आहेत. भाजपच्या कार्यातही या लोकांचा पुढाकार असतो याचे पुरावे समोर आले आहेत. CAA कायद्याला पाठिंबा देण्यासाठी ही मंडळी भाजपच्या व्यासपीठावर होती,’ याकडंही सावंत यांनी लक्ष वेधलं आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणाबाबतची भाजपाची भूमिका केवळ दिखावा असून त्यांना केवळ राजकारण करायचं आहे अशा शब्दात मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपची दुटप्पी भूमिका चव्हाट्यावर आणल्याचंही ते म्हणाले.
काँग्रेस सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी #मराठाआरक्षण बाबत भाजपची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत.
आरक्षणाबाबत भाजपचा कळवळा दिखाऊ असून, या मुद्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचे आहे, हे स्पष्ट आहे.@sachin_inc— Ashok Chavan (@AshokChavan1958) May 27, 2021
आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबतची भाजपाची दुतोंडी भूमिका पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे. त्यांनी आज मांडलेले मुद्दे अतिशय गंभीर आहेत. आरक्षणाबाबत भाजपाचा कळवळा दिखाऊ असून या मुद्द्यावर त्यांना केवळ राजकारणच करायचं आहे, हे स्पष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘अगोदर एक व्हा, मग मराठा आरक्षणासाठी केंद्राकडेही जावू’, विखे पाटील यांची भूमिका
- ‘मृतदेहांवरून राजकारण कसे करावे हे ‘या’ गिधाडांकडून शिकावं’, केंद्राचा राहुल गांधींवर पलटवार
- ‘माझ्या नशीबामुळेच पेट्रोलचे भाव कमी झाले!’, राष्ट्रवादीकडून मोदींचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल
- भाजप १ लाख गावांना कोरोनासंबंधी मदत करणार
- ‘भाजप ऐकत नसेल तर संभाजीराजेंनी खासदारकीचा राजीनामा द्यावा’, हर्षवर्धन जाधव यांचा सल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

