मुंबई : भाजप नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ‘अखंड भारत’ या संकल्पनेवर पूर्ण विश्वास असल्याचं म्हटलं आहे. ‘आम्हाला हा विश्वास आहे की एक दिवस कराचीदेखील भारतात असेल’ असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. मुंबईतील एका ‘कराची स्वीटस्’ नामक दुकानावरून शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवर ते बोलत होते.
त्यांच्या या विधानावर अनेक नेत्यांनी टीका केली आहे. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील एक मिश्किल ट्विट करून देवेंद्र फडणवीस व अमृता फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा लगावला आहे. अमृता फडणवीस यांना त्यांच्या गाण्यावरून प्रचंड ट्रोल केलं जात. अमृता फडणवीसांच्या गाण्याचाच मुद्दा धरून भाई जगताप यांनी टीका केली आहे.
‘फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा, कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील. मग कराची आपलीच!’ अशी खोचक टीका त्यांनी ट्विटरद्वारे केली आहे. तर, शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या या वक्तव्यावरून फडणवीसांना ‘आधी पाकिस्ताननं बळकावलेलं काश्मीर भारतात आणा, कराचीला आपण नंतर जाऊ,’ असं म्हणत त्यांनी खिल्ली उडवली आहे.
फक्त एक गाण्याचा कार्यक्रम ठेवा
कराचीकर घरंदारं सोडून पळून जातील.
मग कराची आपलीच!
— Bhai Jagtap – भाई जगताप (@BhaiJagtap1) November 24, 2020
महत्वाच्या बातम्या
- चंद्रकांतदादांना कोणी सांगितलं आम्हाला मुख्यमंत्रिपदाची स्वप्न पडली?; अजित पवारांचं प्रत्युत्तर
- सुजय विखे व राम शिंदे यांचे अखेर मनोमिलन; स्थानिक आमदारांसाठी धोक्याची घंटा?
- बाळासाहेबांनी जो नियम पाळला तो उद्धव ठाकरेंनी मोडला – चंद्रकांत पाटील
- २६ नोव्हेंबरच्या कामगार संघटनांच्या देशव्यापी बंदला काँग्रेस पक्षाचा पाठिंबा- बाळासाहेब थोरात
- ‘उद्धव ठाकरेंना कॉपी करूनही उत्तर देता येणार नाही’; चंद्रकांत पाटलांची मिश्किल टीका


