औरंगाबाद : शहरात १६ जानेवारी पासून लसीकरणाला प्रारंभ झाला असून आजवर पहिल्या टप्यात आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांना लस देण्यात आली. दुसर्या टप्यात फ्रंटलाईन वर्कर आणि तिसर्या टप्यात ६० वर्षांवरील व ज्यांचे वय ४५ पेक्षा जास्त आहे, मात्र त्यांना गंभीर आजार आहेत अशा लाभार्थ्यांना लस देण्यास आली. आता मनपा प्रशासनाने जम्बो लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. व्यापारी, कर्मचारी, कामगार वर्गाचेही लसीकरण सुरू झाले आहे. मात्र शहरात आजचा दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे लसीकरण मोहिम संकटात सापडण्याची शक्यता आहे.
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी लसीकरण व मास्क वापरणे हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे पालिकेने सुरुवातीपासून लसीकरण मोहिम प्रभावीपणे सुरू केली आहे. आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स, जेष्ठ नागरिक, ४५ वर्षांवरील आजारी नागरिक आणि आता सरसकट ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. त्याचबरोबर बँक कर्मचारी, व्यापारी, कामगारांचेही लसीकरण कालपासून सुरु झाले आहे. लस घेतलेल्या नागरिकांना कोरोना सौम्य होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
त्यामुळे लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी दर आठवडयाला एक लाख लसींच्या साठयाची मागणी केली जात आहे. मात्र त्या प्रमाणात लसींचा साठा उपलब्ध होत नाही. सध्या शहरात आजचा दिवस पुरुष शकेल एवढाच लसींचा साठा शिल्लक आहे. मागील आठवड्यात शहराला ६० हजार लसी मिळाल्या होत्या. मंगळवारी संध्याकाळपर्यंत लसींचा साठा येण्याची शक्यता आहे. मात्र जर वेळेत लसी मिळाल्या नाहीत तर काही दिवस लसीकरण बंद करावे लागू शकते.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘तारक मेहता ‘च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; मनोरंजनाची मिळणार डबल मेजवानी
- कोरोनाचा परिणाम, अंड्यांचे भाव वधारले
- मोठी बातमी : राहुल गांधी यांना कोरोनाची लागण
- भाजपच्या आजी – माजी आमदारांचे ऑक्सिजनसह विविध मागण्यांसाठी हिंगोलीत उपोषण
- दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘गंगूबाई काठियावाडी’ साठी घेणार मोठा निर्णय
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

