हिंगोली : जिल्ह्यातील कोविड रुग्णांना आरोग्य सुविधा द्या.तसेच ऑक्सीजन, रेमडेसिवीर इंजेक्शन तुटवडा याकडे सरकारला जागे करण्यासाठी भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, माजी आमदार गजानन घुगे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
शहरासह जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णांच्या संख्या लक्षात घेता आरोग्याच्या सुविधा या अपुऱ्या आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण तसेच नातेवाईकांचे उपचाराअभावी हाल होत आहेत. कोरोना रुग्णासाठी महत्वाचे असलेले ऑक्सिजन बेड शासकीय रुग्णालयात मिळतच नाहीत. याच बरोबर ऑक्सिजनचा साठ्याचा तुटवडा देखील भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन देखील गरजेनुसार वेळेत मिळत नाहीत.
त्यामुळे इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप आमदार तानाजी मुटकुळे यांनी या वेळी केला आहे. याच बरोबर जिल्हयात कोरोना प्रतिबंधक लस देखील मिळत नाहीत. त्यामुळे अनेक ठिकाणी लसिकरण थांबलेले आहेत. शहरासह जिल्हयात मुबलक प्रमाणात लस उपलब्ध करुन द्यावी. आरटीपीसीआर चाचण्यांचे अहवाल हे वेळेत देणे गरजेचे आहे. यासह इतर मागण्यांकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भाजपकडून या अगोदर उपोषणाचा इशारा दिला होता. त्या अनुषंगाने मंगळवारी दहा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजी – माजी आमदारांसह शहरासह जिलह्यातील पदाधिकारी या वेळी उपोषणास बसले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- ऑक्सिजनसाठी ३ कोटी, तुळजापुरात हवेवर प्लँट, उस्मानाबादच्या पालकमंत्र्यांची घोषणा
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
- संतापजनक! घरासमोर येऊन इशारे केल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या
- आ.गायकवाड यांच्या समर्थकांनी हल्ला केल्याचा आ.संजय कुटेंचा आरोप


