Share

दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ‘गंगूबाई काठियावाडी’ साठी घेणार मोठा निर्णय

Published On: 

मुंबई : दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि त्याच्यां चित्रपटाचा वाद हे समीकरण सगळ्यांच्या परिचयाचे झाले आहे. आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला त्यांचा गंगूबाई काठियावाडी हा आगामी चित्रपट या ना त्या कारणाने वादात सापडत असतो. कोरोनामुळे आधीच चित्रीकरण लांबल्याने ते अडचणीत आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच असल्याने ते या चित्रपटासंदर्भात मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट कोरोनामुळे संजय लीला भन्साळी ओटीटीवर प्रदर्शित करू शकतात अशी चर्चा मनोरंजन क्षेत्रात आहे. हा चित्रपट निर्धारित तारखेनुसार ३० जुलै रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार होता. राज्य आणि देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे त्यामुळे त्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागणार असल्याचीही चर्चा आहे. आपल्या इतर चित्रपटांप्रमाणे हा चित्रपटही चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित कराण्याची त्यांची इच्छा होती. मात्र परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना ओटीटीचा सहारा घ्यावा लागणार आहे.

अनेक निर्मात्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव बघता त्यांच्या चित्रपटाचे प्रदर्शनची तारीख पुढे ढकलली आहे, त्यात अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी यांच्या ‘चेहरे’ या चित्रपटाचाही समावेश आहे. मात्र गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेली आलिया भट्ट या चित्रपटात ती गंगूबाईची व्यक्तिरेखा साकारणार आहे. आलीया या निर्णायावर काय प्रतिक्रिया देते याची उत्सुकता चाहत्यामध्ये आहे. कारण या चित्रपटाच्या थिएटर रिलीजबद्दल आलिया उत्साही होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!