जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाच्या संकटात विविध अफवांमुळे पोल्ट्री चालकांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. याचा परिणाम अंड्यांवरही झाला होता. पण आता रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अंडी उपयोगी ठरत असल्याने त्यांची मागणी वाढली आहे. कोरोना रुग्णांसाठी अंडी खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातोय. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने गेल्या दोन आठवड्यात अंड्यांच्या कॅरेटचे दर १० रुपयांनी वाढलेत. महिनाभरात हे दर १८० रुपयांपर्यंत पोहोचतील असा अंदाज आहे.
कोरोना काळात संसर्ग झालेल्या आणि कोरोनाचा प्रतिकार करण्यासाठी अंडीचा आहारात वापर वाढवण्यात आल्याचे विक्रीवरून लक्षात येत आहे. बाधितांसाठी उभारलेल्या क्वारंटाइन सेंटरमध्येही अंडी देण्यात येताहेत. घरीच उपचार सुरू असलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांकडून दररोज सकाळ व सायंकाळी रुग्णाला अंडी देण्यात येतात. त्यामुळे जळगाव शहरातील होलसेल अंडी विक्रेत्यांकडे थेट डझनभर अथवा कॅरेट खरेदी करण्याकडे कल वाढलाय.
सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कोंबड्यांचे अंडी देण्याचे प्रमाण काही प्रमाणात घटते. त्यामुळे पुरवठा कमी आणि मागणी जास्त होतेय. त्याचा परिणाम दरवाढीवर झालाय. दोन आठवड्यापूर्वी एका कॅरेटचा दर १४० रुपये इतका होता. आता ते १५० रुपयांवर गेलाय. एका कॅरेटमध्ये अडीच डझन म्हणजे ३० अंडी असतात. महिनाभरात कॅरेटचे दर १८० रुपयांपर्यंत पोहोचू शकतात, असा दावा अंडी विक्रेत्यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- १८ वर्षांवरील सर्वांना कोरोना लस, जाणून घ्या लस घेण्याची प्रक्रिया
- ‘लस घेतलेल्या वारकऱ्यांना चैत्री वारीसाठी परवानगी द्या’, कीर्तनकार महासंघाची मागणी
- ‘नवाब मलिकांनी आता तरी तोंड काळे करावे’, भाजपच्या अतुल भातकळकरांचे आव्हान
- धक्कादायक! नऊ महिन्यांत महाराष्ट्रात १०२ पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू
- ‘आमदार निधीतील एक कोटी घ्या; पण ऑक्सिजन व रेमडेसिविर द्या’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

