Share

‘तारक मेहता ‘च्या प्रेक्षकांसाठी खुशखबर; मनोरंजनाची मिळणार डबल मेजवानी

Published On: 

मुंबई : ‘तारक मेहता’ ही मालिका अनेक वर्षापासुन प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेची लोकप्रियता पाहून या मालिकेच्या निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी याचे अॅनिमेटेड व्हर्जन घेऊन आले आहेत. अॅनिमेटेड वर्जनचे नाव हे ‘तारक मेहता का छोटा चश्मा’ असं आहे. खास लहान मुलांसाठी हा शो डिझाइन केलेला आहे.

‘तारक मेहता’च्या निर्मात्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ‘तारक मेहता’मधील पत्रकार पोपटलाल शोच्या अॅनिमेटेड व्हर्जनची माहिती देताना दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये पोपटलाल म्हणतो की, ‘प्रिय प्रेक्षकांनो, आम्ही तुमच्यासाठी ‘तारक मेहता का छोटा चश्मा’ हा आणखी एक मनोरंजन कार्यक्रम घेऊन येत आहोत. १९ एप्रिलपासून तारक मेहता का छोटा चश्मा प्रसारित होणार असल्याची घोषणा निर्मात्यांनी केली होती. सोनीने मुलांसाठी तयार केलेल्या सोनी याय या वाहिनीवर हा शो प्रसारित करण्यात येत आहे.

https://twitter.com/TMKOC_NTF/status/1383284210635481089

नुकतंच अॅनिमेटेड वर्जनचे टायटल ट्रॅक प्रदर्शित करण्यात आले होते. यामध्ये पात्रांच्या आश्चर्यकारक गोष्टी दर्शविल्या गेल्या आहेत. हा गाण्यात तारक मेहता चा प्रवास दाखवला होता. या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत गोकुलधाम सोसायटीचा नवीन अवतार दाखवल्या जात आहे. सोबतच हा शो प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन करणार, अशी निर्मात्याना विश्वास आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!