Share

महाराष्ट्र दिनाला दोन ठाकरेंची रंगणार जुगलबंदी; उद्धव ठाकरे घेणार पुण्यात सभा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : १ मे ‘महाराष्ट्र दिन’ हा महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा होतो. पण यावर्षी ‘महाराष्ट्र दिन’ ला मोठ्या दोन घडामोडी घडणार असल्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तविली जात आहे. १ मे रोजी औरंगाबादमध्ये मनसे प्रमुख राज ठाकरे यांची जाहीर सभा होणार असल्याची घोषणा केली आहे, तर याच दिवशी पुण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सभा घेण्याची घोषणा केली आहे.

सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. भोंग्यांचा मुद्दा, हनुमान चालीसा मुद्दा यामुळे राजकीय वातावरण तापलेलं आहे. अशातच राज ठाकरे हे औरंगाबाद येथील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर १ मे रोजी सभा घेणार आहेत. मशिदीवरील भोंग्यासोबतच ते औरंगाबादचे नाव बदलून सांभाजीनगर करण्याच्या होणाऱ्या मागणीवरून शिवसेनेवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. त्यामुळे सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दरम्यान, मनसेनं या सभेचा एक टीझरही प्रकाशित केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीटरला हा टीझर शेअर केला असून टीझरमध्ये औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यात आला आहे. तसेच चलो संभाजीनगर अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या टीझरमध्ये राज ठाकरेंच्या सभेतील काही वक्तव्यांचा वापर करण्यात आला आहे.

याचबरोबर राज ठाकरे यांची १ मे ला सभा होत असतानाच, उद्धव ठाकरे सुद्धा याच दिवशी पुण्यात सभा घेणार आहेत. विशेष म्हणजे यापूर्वीच त्यांनी, “लवकरात लवकर मला मोठी सभा घ्यायची आहे. तिकडे परत एकदा मास्क काढून बोलायचं आहे. त्या सभेत सगळ्यांचा एकदाचा काय तो परामर्श आणि सोक्ष मोक्ष लावून टाकायचाय”, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्याही यासभेत कोण-कोण निशाण्यावर असणार? याकडे सुद्धा लोकांचे लक्ष आहे.

महत्वाच्या बातम्या – 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!