🕒 1 min read
मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये कपात केली. त्यानंतर केंद्राने सर्व राज्यांना पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित करात (व्हॅट) कपात करण्याचे आवाहन केले. मात्र, बिगरभाजप शासित अनेक राज्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मात्र राज्यांनी देशहितासाठी इंधनावरील व्हॅट कमी करून लोकांना स्वस्तात पेट्रोल-डिझेल द्यावे, असे जाहीर आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. मात्र यावरूनच काँग्रेसने केंद्रावर निशाणा साधला आहे.
“एखाद्याचं किती ढोंगी असावं? काँग्रेसच्या काळात ३ रुपये असलेली एक्सईज ड्युटी मोदींनी 32 रुपये केली आणि आता तेच इतरांना पेट्रोलवरचा टॅक्स कमी करायला सांगतायत!”, असा टोला कॉंग्रेसने लगावला आहे.
एखाद्याने किती ढोंगी असावं?
काँग्रेसच्या काळात ३ रुपये असलेली एक्सईज ड्युटी मोदींनी 32 रुपये केली आणि आता तेच इतरांना पेट्रोलवरचा टॅक्स कमी करायला सांगतायत!
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 27, 2022
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पेट्रोल, डिझेलवरील कर कमी न केल्याबद्दल महाराष्ट्रासह काही राज्यांबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र राज्यामुळे पेट्रोल, डिझेल महागले ही वस्तुस्थिती नसल्याचा पलटवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला. केंद्र सरकारच महाराष्ट्राला सापत्न वागणूक देत असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, आज मुंबईत एक लिटर डिझेलच्या दरामध्ये २४ रुपये ३८ पैसे केंद्राचा तर २२ रुपये ३७ पैसे राज्याचा कर वाटा आहे. पेट्रोलच्या दरात ३१ रुपये ५८ पैसे केंद्रीय कर तर ३२ रुपये ५५ पैसे राज्याचा कर आहे. त्यामुळे राज्यामुळे किमती महाग झाल्या ही वस्तुस्थिती नाही.
महत्वाच्या बातम्या:
- भाजप – राष्ट्रवादीची सरकार स्थापण्याची चर्चा २०१७ मध्ये, आशिष शेलारांचा गौप्यस्फोट
- “…सल्ला फक्त हिंदूंना आणि तुमच्या इफ्तार दावतचे जाहीर प्रदर्शन”, अतुल भातखळकरांचा शरद पवारांना टोला
- “राजधानी दिल्लीत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न…”, शरद पवारांनी सुनावले
- “…या संकटाशी सर्वांनाच एकत्रित मुकाबला करण्याची गरज आहे”, संजय राऊत यांचे वक्तव्य
- “काही लोक आपल्या दरम्यान असलेला बंधुभाव…”, दिलीप वळसे पाटलांचा विरोधकांवर निशाणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
