औरंगाबादः ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर आता औरंगाबाद महापालिकेने शाळा सुरु करण्याच्या निर्णयात बदल केला आहे. शहरातील पहिली ते पाचवीच्या शाळा आता १० डिसेंबरनंतर सुरु होतील असा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला आहे. नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारद्वारे नव्या उपाययोजना केल्या जात आहे. औरंगाबाद महापालिकेअंतर्गत येणाऱ्या शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा आता १ डिसेंबरऐवजी १० डिसेंबर रोजी सुरु होतील, असे महापालिकेच्या वतीने कळवण्यात आले आहे.
औरंगाबाद महापालिकेचे उपायुक्त संतोष टेंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारीचे उपाय म्हणून शहरातील पहिली ते चौथीच्या शाळा येत्या १० डिसेंबरपर्यंत बंदच राहतील. १० तारखेनंतर शहरातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर शाळा सुरु करायच्या की नाही, याबाबत निर्णय घेतला जाईल. १ डिसेंबरपासून शाळा सुरू होणार त्यामुळे बच्चे कंपनीमध्ये आनंदाचे वातावरण होते.
पालकांनीही मुलांना शाळेत पाठवण्यास संमती दर्शवली होती. मात्र आता ऑमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्यास आणखी विलंब लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान मुलांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी मुलांना स्कूल व्हॅनमधून शाळेत पाठवावे की नाही, किंवा मुलांना लसीकरणाशिवाय शाळेत पाठवावे की नाही, अशी चिंता पालकांना सतावत होती. त्यातच मागील चार दिवसात ओमिक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे संकट उभे राहिल्याने या चिंतेत अधिकच भर पडली. शहरातील पाचवी ते दहावीच्या शाळा सुरु असून अद्याप त्या पुढे किती दिवस सुरु ठेवायच्या, यावर निर्णय झालेला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ममता यांच्या भेटीनंतर पवारांनी कॉंग्रेसबद्दल केलं ‘हे’ मोठं विधान
- …मग 5 हजार कर्मचाऱ्यांचे निलंबन हा काय लोकशाहीचा विजय का?- सदाभाऊ खोत
- ममता बॅनर्जी यांच्या भेटीनंतर शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
- ‘महाविकास आघाडी सरकार पालथ्या पायाचं, त्यामुळे महाराष्ट्र अडचणीत’
- ममता बॅनर्जी म्हणाल्या, सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

