🕒 1 min read
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीच्या वसुलीचे गंभीर आरोप केले होते. अंबानी स्फोटक प्रकरण व मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याचे नाव आल्यानंतर परमबीर सिंह यांची बदली करण्यात अली होती. यानंतर नाराज झालेल्या परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून हे गंभीर आरोप केले होते.
या सर्व प्रकरणाची सध्या सीबीआय चौकशी सुरु असून अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. परंतु हे प्रकरण घडताच परमबीर सिंग यांच्यावर एकापाठोपाठ एक अनेक तक्रारी विविध ठिकणी नोंदवण्यात आल्या आहेत. दरम्यान, ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी अंतरिम दिलासा दिला होता. साेमवार, २४ मे पर्यंत त्यांना अटक न करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.
आज पुन्हा ९ जूनपर्यंत ॲट्रॉसिटीच्या प्रकरणात अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली आहे. मात्र, तोपर्यंत परमबीर यांनी तपासयंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य करावं, अशी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात विनंती केली आहे.
तर परमबीर सिंग यांच्यावरील गुन्हा दखलपात्र आहे आणि गंभीर गुन्हा घडल्याचे तक्रारीवरून दिसून येते, तसेच सुरू असलेल्या तपासाआड न्यायालय येऊ शकत नाही. तक्रारदाराने केलेले आरोप २०१५-१६ मधील आहेत. त्या प्रकरणाचे आणि आता या प्रकरणाचा (देशमुख यांच्यावरील आरोपांचा) काहीही संबंध नाही, असं राज्य सरकारतर्फे ज्येष्ठ वकील डी.खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितलं. दुसरीकडं सिंह यांनी मात्र राज्य सरकार आपल्याला मुद्दाम लक्ष्य करून, आपल्याविरोधात खोटे गुन्हे नोंदवत आहे, असा दावा केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘तीन नापासांनी मार्क एकत्र करून सरकार स्थापन केलं, आता विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये’
- आदित्य ठाकरे उपनगरात दाखवा, कोरोना लसीकरण फुकट मिळवा; भाजपची अनोखी ऑफर
- सचिनने खराब गोलंदाजी करायला सांगितल्याचा पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूचा खळबळाजनक दावा
- मराठा आरक्षण : संभाजीराजेंच्या महाराष्ट्र दौऱ्याची कोल्हापुरातून सुरुवात !
- आरोग्यमंत्र्यांच्या आक्षेपानंतर रामदेव बाबा नरमले, ‘ते’ वक्तव्य घेतले मागे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

