Share

कोरोनाची तिसरी लाट: औरंगाबादेत बालकांसाठी ७३७ बेड्सची व्यवस्था

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेत लहान बालकांना कोरोनाची लागण होण्याचा धोका तज्ज्ञांनी वर्तवला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने जय्यत तयारी सुरु केली आहे. बालकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्यासाठी शहरातील विविध रुग्णालयात ७३७ बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये ४५ व्हेंटिलेटर्स आणि ४३७ ऑक्सिजनचे बेड्स असणार आहे. सोबतच एमजीएम आणि मेल्ट्रॉनमधील बाल कोविड सेंटरमध्ये पालिकेचे डॉक्टर्स कार्यरत ठेवले जाणार आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी दिली.

औरंगाबाद शहरात मागील काही दिवसांपासून रुग्ण संख्या घटत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एकूणच शहरात दिलासादायक वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची दुसरी लाट थोपवण्यात आपण यशस्वी झालो असल्याचे आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांनी सांगितले आहे. मात्र तिसऱ्या लाटेचा धोकाही कमी झालेला नाही. अनेक तज्ञांनी तिसरी लाट सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत येऊ शकते असे सांगितले आहे. या तिसऱ्या लाटेमध्ये लहान बालकांना कोरोनाची लागण होण्याचा सर्वाधिक धोका वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मनपाने यासाठी तयारी सुरू केलेली आहे.

राज्य सरकारने बालकांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या दृष्टीने तयारी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पालिका प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी तिसर्‍या लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचे जाहिर केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले की, शहरात बालकांसाठी गरवारे कंपनीत बाल कोविड रुग्णालय उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच एमजीएम स्पोर्ट कॉम्प्लेक्समध्येही शंभर बेड्सचे बाल कोविड रुग्णालय तयार केले जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!