Share

जो बायडन हे निवडणूक हरले आहेत, पण ते पराभव स्वीकारत नाहीत : डोनाल्ड ट्रंप

Published On: 

🕒 1 min read

अमेरिका :माझे मित्र जो बायडन हे निवडणूक हरले आहेत, पण ते पराभव स्वीकारत नाही. त्यामुळेच त्यांनी कोर्टात जाण्याची तयारी केली आहे’, असा टोला लगावत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज लगावला. ही निवडणूक आम्ही जिंकणारच आहोत. हळूहळू पुढे सरकत आहोत. पण,चिंता करण्याची गरज नाही. विजय आपलाच होईल’, असा विश्वासही ट्रम्प यांनी पुढे व्यक्त केला.

रॉयटर्स वृत्तसंस्थेनं दिलेल्या वृत्तानुसार, फ्लोरिडा आणि टेक्सासमध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. टेक्सासमधील विजयामुळे मतमोजणीतील चित्र पूर्णपणे पालटले आहे. टेक्सास, साउथ कॅरोलिना आणि ओक्लाहोमामध्ये ट्रम्प यांनी विजय मिळवला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २१३ जागांवर आघाडी घेतली आहे. तर जो बायडन २२० जागांवर लढत देत आहे.

तर यूएस नेटवर्क्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी ओहायोमध्ये विजय मिळवला आहे. पण, निकाल जसे जसे हाती येत आहे, तशी अमेरिकेत परिस्थिती आणखी चिंताजनक बनत चालली आहे. ट्रम्प यांच्या निवास्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा अलबामा, मिसिसिप्पी, ऑक्लाहोमा आणि टेनेसी या भागांमध्ये विजय मिळवण्यात यश आलं आहे. तर बायडन यांनी कनेक्टिकट, डेलावेर, इलिनॉय, मेरीलँड, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी रोड आयलँड या भागांमध्ये विजय मिळवला आहे.अमेरिकेत एकूण ५० प्रांत आहेत.त्यात सर्वाधिक राज्यात आपली सत्ता स्थापित करणारा पक्ष राष्ट्राध्यक्ष बनवतो.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!