Share

ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रस्त्यावर

Published On: 

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष सत्ताधारी महाविकास आघाडीला चांगलेच कोंडीत पकडत आहेत. त्यात आता आणखी भर पडलीय. महाविकास आघाडीमधील मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी, ऑक्सिजन आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. या संबंधीत आंदोलनात त्या सहभागी झाल्या असून यावरुन भाजप नेते अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.

या संदर्भात अतुल भातखळकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलीय. त्यामध्ये त्यांनी म्हटले की, ‘ऑक्सिजन, रेमडेसिवीरसाठी जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी रस्त्यावर. सोबतीला मनसे… महा विकास आघाडी सरकारच्या निगरगट्ट राजकारणाचे धिंडवडे आता मंत्र्यांच्या घरातील मंडळीच काढू लागली आहेत कारण ज्याचं जळतं त्यालाच कळतं. फेसबुक वर लाईव्ह येऊन बाता मारल्यामुळे जनतेचे प्रश्न सुटत नाहीत.’

आधीच रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत डॉ. शिंगणे यांच्या वक्तव्यामुळे भाजपच्या वतीने महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपाचा सामना सर्वाधिक चर्चेचा विषय बनलाय. त्यात आता जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी रेमडेसिवीर आणि ऑक्सिजनसाठी आंदोलन करत असतील तर भाजपच्या हातात आयता विषयच मिळाला, असे म्हणावे लागेल.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!