Share

खळबळजनक! प्रियकराने लग्नास नकार दिल्याने प्रेयसीसह तिच्या ६ मैत्रिणींनीही केलं विष प्राशन

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली असून प्रियकराने लग्नास नकार दिल्याने ६ मुलींनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे नजीकच्या परिसरात खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे. यापैकी तीन मुलींचा मृत्यू झाला असून बाकी तिघींना मगध मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना औरंगाबादचे एसपी कांतेश कुमार मिश्रा यांनी सांगितले की, ‘मृतांमधील एका तरुणीचे तिच्या भावाच्या मेहुण्यासोबत प्रेमसंबंध होते. तिने आपल्या मैत्रिणींसमोर आपलं प्रेम व्यक्त करत त्याला लग्नासाठी विचारणा केली, मात्र त्याने लग्नास नकार दिला. प्रियकराने लग्नास नकार दिल्यानंतर सगळ्या मैत्रिणी गावी आल्या. नंतर त्यांनी पाहिलं की त्यांच्या मैत्रिणीने विष प्राशन केलं आहे. हे पाहून इतर मैत्रिणींनीही तिची साथ दिली आणि या सगळ्यांनी विष प्राशन केलं.’

दरम्यान, मुलींनी विषारी द्रव्य प्राशन केल्याची घटना घडल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच गावकरी त्यांना वाचवण्यासाठी धावले, मात्र तोपर्यंत 3 मुलींचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच सीओ अवधेश कुमार सिंह, एसएचओ राजगृह प्रसाद, मुख्य प्रतिनिधी अनुज कुमार सिंह घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!