पुणे : वारजे माळवाडी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते स्वर्गीय सोनेरी आमदार रमेशभाऊ जलकुंभाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला. म्हणाले, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव केवळ भाषणात घेऊन उपयोग नाही तर त्यांचे विचार कृतीत आणले पाहिजेत.
असे बोलत अजित पवारांनी भावनिक मुद्यांवरून राजकारण करणाऱ्यांवरही टीका केली. म्हणाले, लोकांना भावनिक बनवून स्वताची राजकीय पोळी भाजण्याचा प्रकार सध्या सुरु आहे. हा प्रकार आपल्या महाराष्ट्राला परवडणारा नाही. आपण एकमेकांना आदर केला पाहिजे, ही आपली शिकवण, परंपरा आहे. काम करताना चुकले तर समजावून सांगितले पाहिजे. असे अजित पवार यावेळी म्हणाले.
तसेच शरद पवारांच्या सिल्व्हर ओक घरावर एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यावर अजित पवार म्हणाले, की मला कळत नाही, कोर्टाचा निकाल लागल्यानंतर गुलाल उधळला, पेढे वाटले मग कोणाच्या सांगण्यावरून हे घडले? मिडीयाला माहित होते मग पोलीस काय करत होते? असे सवाल देखील केले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांकडूनच हल्ल्याचं समर्थन” – संजय राऊत
“शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजपच”; संजय राऊत यांचा आरोप
IPL 2022: पंजाबच्या पराभवानंतर सेहवागचा मयंकला खास सल्ला; म्हणाला ‘तू कॅप्टन आहेस हे विसरून जा…’
मुस्लिम समाजाच्या मोर्चामुळे वसंत मोरेंना प्रचंड वेदना
“…तर त्यांनी मुंबईच्या सीपींना त्वरित राजीनामा देण्यास सांगावे”, सिल्व्हर ओक हल्ल्यानंतर नितेश राणेंची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

