Share

Russia-Ukraine war : “इतिहास ‘हा’ शब्द ओळखतो”, जितेंद्र आव्हाडांचे रशिया-युक्रेन युद्धसंदर्भातील ट्वीट चर्चेत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु झाले असून जागतिक दबाव असूनही दोन्ही देशांनी युद्धाची भूमिका मागे घेतलेली नाहीये. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (२४ फेब्रुवारी) युक्रेनमध्ये आक्रमण सुरू केल्याने राजधानी कीवसह प्रमुख शहरे लष्करी हल्ल्यांखाली आली आहेत. या पार्श्वभूमीवरच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP leader Jitendra Awhad) यांनी ट्वीट केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये एक छोटा मुलगा युद्ध थांबवावे, अशी पोस्टर्स घेऊन उभा आहे. तर सोबतच एक बंदूकधारी सैनिक आणि त्याच्या बाजूला घाबरलेला बालक. अशी विदारक स्थिती दर्शवणारे फोटो पोस्ट करत आव्हाड यांनी म्हटले आहे की, “आपण फक्त हे पाहणार आहोत. सर्व प्रमुख देशांमधील वक्तव्ये ‘आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत’ अशी आहेत. #हिटलर सुरुवातीला थांबला नाही आणि इतिहास हा शब्द ओळखतो.” यातून त्यांनी रशिया-युक्रेनमधील भयावह परिस्थिती अधोरेखित केली आहे.

दरम्यान भारत युक्रेनमधून सुमारे १६००० लोकांना सुरक्षितपणे घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री पुतीन यांच्याशी फोनवर चर्चा केली असून परराष्ट्र मंत्रालय स्थलांतरासाठी जमीन मार्गांची यादी तयार करत आहे.
तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी “पुतिन हे आक्रमक आहेत. पुतिन यांनी हे युद्ध निवडले. आणि आता त्याचे परिणाम त्यांना आणि त्यांच्या देशाला भोगावे लागतील.” असे म्हटले आहे. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यातही रशिया-युक्रेन युद्ध संदर्भात चर्चा (Biden to Discuss with India) होणार आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!