मुंबई: भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या बऱ्याच दिवसांपासून संघातून बाहेर आहे. निवड समिती अशा खेळाडूच्या शोधात होते की, जो संघात हार्दिकची कमतरता भरून काढू शकेल.आणि त्यांना व्यंकटेश अय्यरच्या रूपाने तो खेळाडू मिळाला असल्याचे दिसत आहे. दरम्यान, भारताचा दिग्गज फलंदाज वसीम जाफरनेही हार्दिकला विश्वचषक संघात पुन्हा संधी देऊ नये, असा सल्ला दिला आहे.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाचा उगवता स्टार व्यंकटेश अय्यरने अप्रतिम कामगिरी केली. व्यंकटेशने चेंडूसह २ बळी घेतले, तर त्याच्या बॅटने केवळ १९ चेंडूत नाबाद ३५ धावा केल्या आहेत. व्यंकटेशमध्ये एक नवा फिनिशर आणि चांगला अष्टपैलू खेळाडूही संघाला मिळाला आहे. आता वसीम जाफरने तर हार्दिकच्या आधी व्यंकटेश अय्यरला विश्वचषक संघात स्थान दिले पाहिजे, असे म्हटले आहे. यावेळी व्यंकटेश हार्दिक पांड्यापेक्षा खूप पुढे गेला असून त्याला आणखी संधी द्यायला हवी, असे जाफरचे म्हणणे आहे.
व्यंकटेश अय्यरने आयपीएलमध्ये १० सामन्यांमध्ये ३७० धावा केल्या आहेत. ज्यामध्ये ४ अर्धशतकांचा समावेश आहे. अष्टपैलू व्यंकटेश अय्यरचा गोलंदाज म्हणून टी-२० मध्ये उत्कृष्ट विक्रम आहे. व्यंकटेश अय्यरने एकूण ५९ टी-२० सामन्यांमध्ये ३२ विकेट घेतल्या आहेत. व्यंकटेश अय्यरने १० प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये७ विकेट्स आणि २४ लिस्ट ए सामन्यांमध्ये १९ विकेट्स घेतल्या आहेत. व्यंकटेश अय्यरने आपल्या चमकदार कामगिरीने दाखवून दिले की आता हार्दिक पंड्याचे संघात पुनरागमन सोपे असणार नाही.
महत्वाच्या बातम्या
- साहाच्या खुलास्यानंतर बीसीसीआय उचलणार मोठे पाऊल!
- Breaking News : चारा घोटाळयाप्रकरणी लालू यादव यांना पाच वर्षांची शिक्षा
- भारताच्या १६ वर्षीय ग्रँडमास्टर प्रग्नानंधाकडून वर्ल्ड नं १ कार्लसन पराभूत
- वाढदिवसासाठी सुट्टीवर येणार होता, पण त्याआधीच काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना आले वीरमरण
- “…तर माझ्या बायकोला आणि आईला जाऊन विचारा”, राऊतांच्या ‘भ***’ वक्तव्यावर सोमय्या संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

