Jitendra Awhad | मुंबई : राष्ट्रवादी (NCP) पक्षाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना मॉलमधील मारहाण प्रकरणात शुक्रवारी अटक करण्यात आली होती. त्यांना आज जामीन मिळाला. जामीन मिळताच जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी जोरदार हल्लाबोल केला असून मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याबाबत देखील त्यांनी विधान केलं आहे.
यावेळी, या चित्रपटाला कोणाताही ऐतिहासिक पुरावा नाही. जे चित्रपटात दाखवले जातय त्याला विरोध केला म्हणून जर कारवाई होणार असेल तर मी फासावर पण जायला तयार असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं आहे. तसेच हर हर महादेव सिनेमात जाणीवपूर्वक कृष्ण भास्कर कुलकर्णी यांना दाखवले गेले नसल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.
यादरम्यान, या चित्रपटाला राज ठाकरे यांचा आवाज दिला गेला आहे. राज ठाकरे हुशार आहेत मी त्यांच्या पेक्षा छोटा आहे. त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी हे मी सांगणार नाही. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृती करण म्हणजे अस्मितेची आणि मराठी माणसाची विकृती करणं आहे, असं आव्हाड म्हणाले.
दरम्यान, माझ्या अटकेशी पोलिसांचा संबंध नाही, पोलिसाांच्या डोळ्यात हतबलता दिसत होती. मला चौकशीसाठी पाच वाजता बोलावलं मात्र अडीच वाजताच अटक केली. हे जाणून बूजून करण्यात आल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Bipasha Basu Baby | आई झाल्यानंतर बिपाशाने केली पहिली पोस्ट, लेकीचं ठेवलं ‘हे’ नाव
- Skin Care Tips | हिवाळ्यामध्ये ‘या’ गोष्टी करतील त्वचेला मॉइश्चरायझर
- Hair Care Tips | केसांमध्ये होणाऱ्या कोंड्यापासून त्रस्त असाल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो
- World Cup Update | भारतामध्ये खेळला जाणार पुढचा विश्वचषक, जाणून घ्या कोणत्या फॉरमॅटमध्ये आणि कधी?
- Travel Guide | कमी बजेटमध्ये देखील होऊ शकते उत्तराखंड ट्रीप, द्या ‘या’ सुंदर ठिकाणांना भेट


