🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) मध्ये फिरण्यासाठी (Travel) उत्तम वातावरण असते. त्यामुळे हिवाळ्यामध्ये पर्यटक फिरण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधायला लागतात. त्याचबरोबर या वातावरामध्ये लोक हिल स्टेशनला भेट देतात कारण या महिन्यातील स्टेशनला भेट देण्याची मजा वेगळीच असते. अशा परिस्थितीत हिल स्टेशन म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर उत्तराखंड (Uttarakhand) उभे राहते. कारण भारतातील सर्वात सुंदर हिल स्टेशन हे उत्तराखंड राज्यांमध्ये स्थित आहे. पण अनेकदा बजेटमुळे आपण तिकडे जाण्याच टाळतो. पण तुम्हाला माहित आहे का? उत्तराखंडच्या काही ठिकाणांना भेट देऊन तुम्ही बजेटमध्ये उत्तराखंड ट्रीप करू शकता. ठिकाणांबद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.
अल्मोडा
तुम्ही जर उत्तराखंडला भेट देण्याचा प्लॅन करत असला तर उत्तराखंडमधील अल्मोडा या ठिकाणाला नक्की भेट द्या. कारण या ठिकाणी तुमची कमी बजेटमध्ये उत्तम ट्रीप होऊ शकते. त्याचबरोबर कुमाऊच्या टेकड्यांमध्ये बसलेले हे हिल स्टेशन हिमालय पर्वतरांगेने वेढलेले आहे. या ठिकाणी तुम्हाला निसर्ग सौंदर्याबरोबर अनेक ऐतिहासिक मंदिरेही पाहायला मिळतील.
भीमताल
तुम्ही जर कमी बजेटमध्ये उत्तराखंड ट्रीप प्लॅन करत असाल, तर तुम्ही भीमताल या ठिकाणाला नक्की भेट दिली पाहिजे. या ठिकाणी तुम्ही भिमेश्वर महादेव मंदिर, भीमताल तलाव इत्यादी ठिकाणांना भेट देऊ शकता. त्याचबरोबर हे ठिकाण पूर्णपणे निसर्गसौंदर्याने नटलेले आहे.
ऋषिकेश
ऋषिकेश हे ठिकाण प्रामुख्याने पर्यटकांचे आवडते हिल स्टेशन आहे. या ठिकाणी देशातूनच नाही तर घरातील पर्यटक गर्दी करतात. ऋषिकेश मध्ये तुम्ही एक बजेट ट्रिप करू शकता. त्याचबरोबर ऋषिकेशमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे आश्रम उपलब्ध आहेत, जिथे तुम्ही विनामूल्य राहू शकता. त्यामुळे तुमची ऋषिकेश ट्रिप बजेटमध्ये होते.
महत्वाच्या बातम्या
- Bipasha Basu | बिपाशा बासू आणि करण ग्रोवर यांना प्राप्त झाले कन्यारत्न
- T20 World Cup | पाकिस्तान-इंग्लंड सामन्यापूर्वी आयसीसीने केले प्लेईंग कंडिशनमध्ये ‘हे’ मोठे बदल
- Arvind Sawant | “वाईट या गोष्टीचं वाटत की…” अरविंद सावंत यांचा गजानन कीर्तीकर यांच्यावर घणाघात
- Best Sedan Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम सेडान कार
- Chandrashekhar Bawankule | “… म्हणून तिन्हीही प्रकल्प त्यांच्याच हातून गेलेत”, चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
