Share

Skin Care Tips | हिवाळ्यामध्ये ‘या’ गोष्टी करतील त्वचेला मॉइश्चरायझर

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा: हिवाळा (Winter) सुरू होताच त्वचा (Skin) च्या समस्या सुरू व्हायला लागतात. त्याचबरोबर हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी (Dry) पडायला लागते. अशा परिस्थितीत आपण त्वचेवरील कोरडेपणा दूर करण्यासाठी कोल्ड क्रीम किंवा मॉइश्चरायझर चा  वापर करतो. पण तरीही अनेकदा कोल्ड क्रीम आणि मॉइश्चरायझरच्या वापरानंतर आपली त्वचा कोरडीच राहते. पण तुम्हाला माहित आहे का? काही नैसर्गिक गोष्टींचा वापर करून तुम्ही त्वचेला कोमल आणि मॉइश्चराईस ठेवू शकतात. त्याच नैसर्गिक घटकांबद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

मध

हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी मध हा एक रामबाण उपाय आहे. यासाठी तुम्हाला आठवड्यातून दोन-तीन वेळा चेहऱ्यावर मध लावावे लागेल. यासाठी तुम्हाला एक चमचा मध घेऊन चेहऱ्यावर हलक्या हाताने त्याची मालिश करावी लागेल. मालिश झाल्यानंतर दहा मिनिटे चेहरा तसाच ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. नियमित असे केल्याने तुम्हाला तुमच्या चेहऱ्यामध्ये फरक जाणवेल.

बदाम तेल

विटामिन-ई ने समृद्ध असलेले बदाम तेल हिवाळ्यामध्ये तुमच्या चेहऱ्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. यासाठी तुम्हाला आंघोळीपूर्वी किंवा चेहरा धुण्यापूर्वी हे तेल चेहऱ्यावर लावावे लागेल. चेहऱ्यासोबत फाटलेल्या ओठांवर देखील तुम्ही बदाम तेलाचा वापर करू शकतात.

दही

हिवाळ्यामध्ये चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी तुम्ही चेहऱ्यावर साधे दही लावू शकतात. यासाठी तुम्हाला एक चमचा दही घेऊन दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर हलक्या हाताने मालिश करावे लागेल. मालिश झाल्यावर दहा ते पंधरा मिनिटं चेहऱ्यावर दही तसेच राहू द्या आणि नंतर साध्या पाण्याने चेहरा धुवा. चेहरा धुतल्यानंतर त्यावर कोल्ड क्रीम लावायला विसरू नका.

कोरफड

हिवाळ्यामध्ये त्वचा निरोगी आणि ताजी ठेवण्यासाठी तुम्ही त्वचेवर कोरफड लावू शकतात. तुम्ही कोरफडीच्या पानांमधील गर किंवा कोरफडीचे जेल थेट चेहऱ्यावर लावू शकतात. जेल किंवा कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावून तो व्यवस्थित सुकू द्या. त्यानंतर चेहरा धुवा. नियमितपणे कोरफडीचा वापर केल्यावर तुम्हाला तुमच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!