🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: टी 20 विश्वचषक (T20 World Cup) च्या दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये इंग्लंड संघाने भारतीय संघाला 10 विकेट्स पराभूत केले. या पराजयामुळे भारतीय क्रिकेट चाहते नाराज झाले असून टीम इंडियाच्या या कामगिरीमुळे सगळेजण नाराजी व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम पडावामध्ये रविवारी म्हणजेच 13 नोव्हेंबर 2022 रोजी टी 20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम महामुकाबला इंग्लंड (England) आणि पाकिस्तान (Pakisthan) या दोन्ही संघांमध्ये खेळाला जाणार आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेटच्या मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतरही संघाला अंतिम फेरीमध्ये स्थान मिळवण्यात यश मिळाले नाही.
दरम्यान, आता भारतीय संघ आणि भारतीय संघाचे चाहते आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 ची वाट बघत आहे. कारण पुढील टी 20 विश्वचषक स्पर्धा वेस्टइंडीज आणि USA मध्ये संयुक्तपणे आयोजित केली जाणार आहे. त्याआधी भारताला आणखी एक विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे आणि ती सुद्धा भारतामध्ये. होय, भारतीय क्रिकेट संघाला मायदेशी पुढील विश्वचषक खेळण्याची संधी मिळणार आहे.
2023 मध्ये पुढील आयसीसी क्रिकेट विश्वचषक होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच भारताकडे विश्वचषकाचे पूर्ण यजमानपद असणार आहे. 1987, 1996 आणि 2011 हे तीन विश्वचषक सामने भारताने संयुक्तपणे आयोजित केले होते. तर 2023 मध्ये हा विश्वचषक सामना एक दिवसीय फॉरमॅटमध्ये म्हणजेच 50 षटकांमध्ये खेळायला जाणार आहे. 2023 च्या ODI कप मध्ये एकूण 10 सहभागी संघ असणार आहे. 2023 मध्ये नोव्हेंबर आणि ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा मागील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेप्रमाणे राऊंड-रॉबिन आणि नॉक-आऊट या स्वरूपामध्ये खेळली जाईल. दरम्यान 2020-23 सुपर लीग स्पर्धेच्या गुणसरणीनुसार 10 संघ या स्पर्धेमधील असतील.
तर, दुसरीकडे आयपीएल 2023 (IPL 2023) साठी बीसीसीआय (BCCI) ने सर्व फ्रेंचायझिंना 15 नोव्हेंबर पर्यंत आपले रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर सर्व फ्रेंचाईजींनी आयपीएल 2023 साठी मिनी ऑक्शनचे नियोजन सुरू केले आहे. क्रिकबज वरून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व संघांचे याद्या तयार झालेल्या असून त्यांची अंतिम पुष्टी होणे बाकी आहे. त्याचबरोबर अनेक फ्रॅंचाईजी आपल्या संघाचे कॅप्टन (Captain) बदलू शकता अशी देखील माहिती बाहेर येत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Travel Guide | कमी बजेटमध्ये देखील होऊ शकते उत्तराखंड ट्रीप, द्या ‘या’ सुंदर ठिकाणांना भेट
- Bipasha Basu | बिपाशा बासू आणि करण ग्रोवर यांना प्राप्त झाले कन्यारत्न
- T20 World Cup | पाकिस्तान-इंग्लंड सामन्यापूर्वी आयसीसीने केले प्लेईंग कंडिशनमध्ये ‘हे’ मोठे बदल
- Arvind Sawant | “वाईट या गोष्टीचं वाटत की…” अरविंद सावंत यांचा गजानन कीर्तीकर यांच्यावर घणाघात
- Best Sedan Car | ‘या’ आहेत भारतातील सर्वोत्तम सेडान कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
