Share

मनसेचा हनुमान चालीसा कार्यक्रम पोलिसांकडून रद्द!

Published On: 

🕒 1 min read

पुणे : मशीदीवर भोंगे वाजत असतील तर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, असा आदेश राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात दिला होता. या आदेशानुसार मनसेच्या कसबा पेठ शाखेचे पदाधिकारी सुरज पंडित यांच्याकडून आज पहाटे पाच वाजता गुरुवार पेठेतील मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्यात येणार होते. मात्र, मनसेचे स्पिकर मीठगंज पोलीस चौकीच्या बाहेर लावण्यापूर्वीच पोलिसांनी मनसैनिकांना समज दिली.

पहाटे चौकीच्या बाहेर मनसैनिक आले नाहीत आणि स्पिकरवर मोठ्या आवाजात हनुमान चालीसाचा आवाजही गुंजला नाही. या प्रकरणानंतर मनसेचे कार्यकर्ते म्हणाले, “ पोलिसांच्या सांगण्यावरून आम्ही आमच्या स्पीकर वर मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा कायक्रम रद्द केला”.

राज ठाकरे यांच्या आदेशानंतर राज्यभरत अनेक मनसे कार्यकर्त्यांकडून विविध ठिकाणी हनुमान चालिसा कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे

महत्वाच्या बातम्या

नवाब मलिकांना मोठा दणका; दोन आठवड्यांनी वाढली न्यायालयीन कोठडी!
रंग बदलणारा सरडा वैगेरे ठीक पण शरद पवारांचं काय?; केशव उपाध्येंचा टोला
“…तर शिवसेना ही राष्ट्रवादीची ‘ढ’ टीम आहे”, आदित्य ठाकरेंच्या टीकेवर मनसेचे प्रत्युत्तर
IPL 2022 : काय वेळ आलीय..! चेन्नई-मुंबई गुणतालिकेत तळाशी; ‘हा’ संघ आहे पहिल्या स्थानी!
अमोल मिटकरींचा राज ठाकरेंना सल्ला; म्हणाले, “त्यांनी आपल्या नवीन बंगल्यात आंबेडकरांची प्रतिमा लावून…”

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!