🕒 1 min read
मुंबई: देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल शरद पवारांचीच गरज आहे. देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असल्याचे संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे. आता यावरच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्वीट करत टोला लगावला आहे.
“३०१ खासदार निवडून आणणाऱ्या मोदीजींसमोर हे संजय राऊत शरद पवारांचा पर्याय दाखवत आहेत. सत्तेचा मोह इतका वाढला आहे की, आपण धनुष्याच्या बाणात आहोत की घड्याळाच्या काट्यात याचाच यांना विसर पडला आहे. रोज सकाळी उठून शरद पवारांचं नामस्मरण सुरूच आहे. उद्धवजी,(Uddhav Thackeray) पुन्हा सांगतो,सावध राहा!”, असे ट्वीट करत चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
शरद पवार खूप मोठे नेते आहेत. आम्ही सर्वच त्यांचा आदर आणि सन्मान करतो. देशातील विरोधी पक्षांना एका सक्षम नेतृत्वाची गरज आहे. सर्व भाजपविरोधी पक्ष एकत्र यावेत, यासाठी हालचाली सुरू आहेत आणि शरद पवारांच्या पुढाकाराशिवाय या एकजुटीचे पाऊल पुढे जाणार नाही, हे आम्हाला सर्वांना माहिती आहे. शरद पवार यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत असते. शरद पवार यांच्याशिवाय मोदींना पर्याय आणि सक्षम विरोधी पक्ष तयार होऊ शकत नाही, असे माझे स्पष्ट मत आहे. देशामध्ये अनेक मोठे नेते आणि ते नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत. मात्र, या सर्व नेत्यांना एकत्र आणण्यासाठी शरद पवार यांनी पुढे यावे. असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
“जैसे ज्याचे कर्म तैसे JC देतो रे ईश्वर”, भातखळकरांचा नवाब मलिकांना टोला
“पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही”- संजय राऊत
“मतांची पोळी भाजून घेण्यासाठी…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
IPL 2022 : महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सुपरफ्लॉप..! जडेजा म्हणतो, “त्याला….”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
