🕒 1 min read
मुंबई : भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने अनेक मोठे विक्रम केले आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून त्याला शतक झळकावता आलेले नाही. त्याने टीम इंडियाच्या तिन्ही फॉरमॅटचे कर्णधारपद सोडले आहे. आयपीएल २०२२ मध्ये तो आरसीबीचा खेळाडू म्हणून मैदानात उतरत आहे. संघाचे नेतृत्व फाफ डू प्लेसिसकडे आहे.
यंदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. एका सामन्यात त्यांना पराभव पत्करावा लागला आहे. संघाला अद्याप आयपीएलचे विजेतेपद मिळालेले नाही. दरम्यान विराट कोहलीने असा दोन सामन्यांचा उल्लेख केला, ज्यामुळे त्याला खूप त्रास झाला आहे. त्यात आयपीएलच्या एका सामन्याचाही समावेश आहे.
विराट कोहलीने आयपीएल २०१६च्या फायनलमधील पराभव आणि २०१६मधील टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधील पराभवांचे वर्णन सर्वात हृदयद्रावक असल्याचे सांगितले. २०१६मध्ये आयपीएलच्या अंतिम सामन्यात सनरायझर्स हैदराबादने आरसीबीचा पराभव केला होता, तर याच वर्षी टी-२० वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये विंडीजने भारताला धूळ चारली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
- IPL 2022 : टाटा, बाय-बाय, खतम..! आकाश चोप्राच्या ट्वीटला चहलनं दिलेलं ‘उत्तर’ वाचून तुम्हीही हेच म्हणाल!
- “जैसे ज्याचे कर्म तैसे JC देतो रे ईश्वर”, भातखळकरांचा नवाब मलिकांना टोला
- “पवारांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय निर्माण होऊ शकत नाही”- संजय राऊत
- “मतांची पोळी भाजून घेण्यासाठी…”, राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया
- IPL 2022 : महाराष्ट्राचा ऋतुराज गायकवाड सुपरफ्लॉप..! जडेजा म्हणतो, “त्याला….”
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
