🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी राज्यात सरकार स्थापन केल्यापासून शिंदे गट आणि ठाकरे गट पाहायला मिळतं आहे. दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. अशातच दसरा मेळाव्याचा मुद्दाही बराच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच शिवसेना पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला एक आव्हान दिलंं आहे.
आदित्य ठाकरे यांचे वक्तव्य-
शिंदे-फडणवीस सरकार निवडणुकांना घाबरत आहे, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. मी राजीनामा देतो तुम्हीही राजीनामा देऊन निवडणूक लढवून दाखवा, असं ठाकरे म्हणाले आहेत.
मी राजीनामा देतो तुम्ही पण द्या-
आपण बघु शकता की, लोक ही उद्धवसाहेबांसोबत उभी आहेत. कोणालाही गद्दारी पटलेली नाहीय. हे निवडणूकांना घाबरतात मग ते मुंबई महानगरपालिकेचे असो नाहीतर 12 गद्दार आमदार, खासदार झालेत किंवा 40 गद्दार जे आमदार झालेत. मी अजूनही सांगतो तुम्ही पण राजीनामा द्या, मी पण वरळी मधुन राजीनामा देतो. एकदा निवडणूक लढवा मग बघा कोण जिंकतय, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटाला चॅलेंज दिलं आहे.
तसेच, दसरा मेळाव्यासंदर्भात आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी विचारले असता, या वर्षीचा दसरा मेळावा शिवतिर्थावरच होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde । “राज ठाकरे थेट वर्षावर दाखल; निमित्त बाप्पांच्या दर्शनाचे, अन्…”
- Shivsena । मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरच दसरा मेळावा घ्यावा ही आमची विनंती नाही तर आग्रह आहे; शिंदे गटातील आमदारच पत्र
- Shivsena । “खैरे म्हणाले राग आला तर गळा दबीन, अन् पाटील म्हणाले त्यांना… “
- Shivsena । “आदित्य ठाकरेंवर टीका केली तर गळाच दाबीन”; चंद्रकांत खैरे गुलाबराव पाटलांवर संतापले
- Uddhav Thackeray । “या दसरा मेळाव्याला मुख्यमंत्रीपदाचा मास्क तोंडावर नसेल, त्यामुळे…”; उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
