🕒 1 min read
मुंबई:- रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल. आम्ही दानवे यांच्या घरासमोर आंदोलन केलं होतं. आता दानवे यांच्या घरात घुसून त्यांना मारावं लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशी घणाघाती टीक राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केली आहे. रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.
रावसाहेब दानवे जालना जिल्ह्यात एका कार्यक्रमात गेले होते. यावेळी कार्यक्रमात बोलत असताना दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्यांनी टिप्पणी केली. हे आंदोलन देशातील शेतकऱ्यांचे नाही. हे एक षडयंत्र आहे. या आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर दानवे यांच्यावर राज्यभरातून टीका होत आहे. बच्चू कडू यांनीही त्यांचं बोलण दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. तसेच रावसाहेब दानवे यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल, असे बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, केंद्र सरकारने घाईघाईत पारित केलेल्या नव्या जाचक कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताही निकाल लागलेला नाही. दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादमध्ये रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, दानवे यांच्या घरासमोर रक्तदान करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : मुख्यमंत्री ठाकरेंपासून अनेक मंत्र्यांच्या संपर्कात आलेले डिसले गुरुजी कोरोनाच्या विळख्यात!
- मराठा आरक्षणावरील स्थगिती कायम; आता एमपीएससी परीक्षा, मेगा भरतीचं काय?
- महाविकास आघाडी सरकारमुळे मराठा युवकांसमोर अंधार; चंद्रकांत पाटलांचा घणाघात
- काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचा पाठिंबा काढून राज्य सरकार पडणार; केंद्रीय मंत्र्याचा दावा
- मुख्यमंत्री आज पुणे-रत्नागिरी-सातारा दौऱ्यावर


