Share

जिंतूर नगर परिषदेत गैरकारभाराने गाठला कळस, भ्रष्ट्राचाराची चौकशी करण्याची आ. बोर्डीकरांची मागणी

Published On: 

परभणी: जिल्ह्यातील जिंतूर येथील नगर परिषदेमध्ये आता गैरकारभारांचा कळस गाठला गेला आहे. जिंतूर नगरपरिषदेत कायमस्वरूपी असा कोणी मुख्याधिकारी नसल्याने येथील प्रशासकीय यंत्रणा व्यवस्थित काम करत नसल्याचे येथील नागरिकांच्या तक्रारी आहेत तसेच भ्रष्टाचार देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे अनेक काम अडत आहेत तसेच काम करायचे असेल तर येथील अधिकारी व कर्मचारी लाचेची मागणी करत असल्याचेही समोर आले आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार मेघना बोर्डीकर यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.

भाजप नेत्या व आमदार मेघना बोर्डीकर यांनी मंत्रालयात जाऊन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. बुधवारी दि. १६ जून रोजी त्यांनी मंत्री शिंदेंची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्यांनी जिंतूर तालुक्यातील परिस्थितीचा आढावा सांगितला तसेच जिंतूर नगर परिषदेत होणाऱ्या गैरकारभारांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे. येथील नगर परिषदेत गैरकारभारांनी आता कळस गाठला आहे, असे बोर्डीकर म्हणाल्या तसेच येथील प्रशासकीय यंत्रणा सुद्धा ढेपाळली आहे, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

या बैठकीची माहिती देताना त्यांनी सोशल मिडियावर या संबंधी माहिती पोस्ट केली आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. जिंतूर नगर परिषदेत गैरकारभाराने कळस गाठला आहे. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने प्रशासकीय यंत्रणा ढेपाळली आहे. अनेक योजनांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या गैरकारभारांची चौकशी करावी, अशी मागणी केली. तसेच पाणीपुरवठ्यासह ईतर अव्यवस्थतेचा त्रास जिंतूर वासीयांना सहन करावा लागतो आहे. तो बंद होण्यासाठी येथे कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी केली. याचबरोबर सेलू शहराच्या विकासासाठी अतिरीक्त निधी देण्याची मागणी देखील या वेळी मेघना बोर्डीकर यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!