औरंगाबाद : भारतामध्ये लोकशाही असली तरी जाती आधारीत समाज व्यवस्था अजूनही जिवंत आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये अनेकदा उमेदवाराची जात महत्त्वाची ठरते. औरंगाबाद शहरातील मतदार देखील जाती-धर्मावर आधारीत मतदान करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी केला आहे. सोशल मीडियावर शरातील पाणी प्रश्नावर एका नागरिकाने उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी कडक शब्दात प्रतिक्रिया दिली आहे.
या संदर्भात सुमीत खांबेकर यांनी म्हटले की, ‘औरंगाबाद शहरातील लोकांना हे कळत नाही, विकास वैगरे त्यांना आवडत नाही, निवडणुकीत जाती-धर्मावर मतदान करतात, मी सर्वात जास्त आंदोलन फक्त पाणी ह्या विषयावर केले आहे औरंगाबाद मध्ये, परंतु मनसे चे कार्यकर्ते जे सातत्याने काम करतात त्यांना मतदान होतं नाही, काम करणाऱ्याला पाठिंबा हवा असतो.’
औरंगाबाद महानगर पालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकच नगरसेवक निवडून आला होता. त्या नंतर मनसेला खाते उघडता आले नाही. आगामी औरंगाबाद महानगर पालिका निवडणुकीची तयारी मनसे करत आहे. यंदा मनसेची शहरातील ताकदही वाढली आहे. त्यामुळे मनसेला मनपा निवडणुकीत चांगले यश मिळण्याची आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- एकटा संभाजी काय करणार ?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी – शाहू महाराज
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

