🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्यातील जीम मालकांची बैठक बोलावली होती यामध्ये राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि लॉकडाऊनबाबत चर्चा केली आहे.
वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी जीम मालकांना केले आहे. जीम मालकांनीही जान है तो जहान है असं म्हणत सरकारला सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली.
आता पुन्हा आपल्याला कोरोनावर लक्ष केंद्रीत करावे लागेल. जान है तो जहान है..या उक्तीनुसार जीव राहीला, तर पुढे आपण व्यायाम करू शकणार आहे. त्यामुळे यापुढे राज्याच्या हिताचा म्हणून जो निर्णय घ्यावा लागेल. त्यामध्ये व्यायामशाळा-जिम चालकांनी सर्व शक्तीनिशी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जीम मालकांना केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक मान्यवरांशी चर्चा करत राज्यातील लॉकडाऊन लावायचा की निर्बंध कडक करायचे यावर चर्चा केली आहे. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.
महत्वाच्या बातम्या
- सध्या भारताशी व्यापारी संबंध ठेऊ इच्छित नाही आयातीचा प्रस्ताव फेटाळत इम्रान खान यांचा निर्णय
- कधीतरी खरं बोला रे नाही तर लोकं तुमच्यावर शेण फेकून मारतील, निलेश राणेंचा मलिकांना टोला
- लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे भाजप नेत्यांना कळायलं हवं – नवाब मलिक
- नांदेड जिल्हा; कोरोना रुग्णांना लूटणाऱ्या खासगी लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
- ‘मास्क वापरला तर ब्युटी पार्लर कसे चालणार ?’ आसामच्या आरोग्य मंत्र्यांच अजब विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
