मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सवांद साधला. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. असेही ते यावेळी म्हणाले होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक मान्यवरांशी चर्चा करत राज्यातील लॉकडाऊन लावायचा की निर्बंध कडक करायचे यावर चर्चा केली आहे. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.
या बैठकी आधीच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अद्याप लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. मात्र, राज्यात दिवसाला कोरोनाचे 50 हजार रुग्ण सापडल्यानंतरही लोकांना परिस्थितीचे सोयरंसुतक नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही लोक गार्डन आणि बाजारपेठांमध्ये बेफिकीरपणे फिरत आहेत. लग्नाला जात आहेत. अशा बेफिकीर वागण्याने एकवेळ अशी येईल की, रुग्णालयात बेड कमी पडू लागतील. लोकांनी वेळीच परिस्थितीचे गांभीर्य ओळखले पाहिजे, असं देखील नवाब मलिक म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे भाजपचे नेते त्यांचं राजकारण करत आहेत. लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे त्यांना कळायलं हवं. मोदी थाळी वाजवा, मेणबत्ती लावा असं म्हणतात. भाजपवाल्यांना लोकांच्या जीवाशी देणघेणं नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नांदेड जिल्हा; कोरोना रुग्णांना लूटणाऱ्या खासगी लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका
- ‘मास्क वापरला तर ब्युटी पार्लर कसे चालणार ?’ आसामच्या आरोग्य मंत्र्यांच अजब विधान
- सीएसकेसाठी धोनी जोरदार पुनरागमन करेल का? यावेळी आव्हान मोठे
- मे अखेरपर्यंत देशभरात कोरोनाचा हाहाकार, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सनं सांगितलं ‘इतकी’ असेल रुग्णसंख्या
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक; आणखी कडक निर्बंध लागणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
