Share

सध्या भारताशी व्यापारी संबंध ठेऊ इच्छित नाही आयातीचा प्रस्ताव फेटाळत इम्रान खान यांचा निर्णय

Published On: 

इस्लामाबाद: नुकतच काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी 23 मार्चला भारताचे शेजारील राष्ट्र पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन होता यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना शुभेच्छा संदेश पाठवला होता. नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवरून भारत पाकिस्तानचे संबंध तणावपूर्ण असतात मात्र तरी देखील भारताकडून अनेकदा पाकिस्तानला मैत्रीचा हात दिला जातो तर मदत देखील केली जाते.

त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये व्यापाराबाबत महत्त्वाची बैठक झाली होती यामध्ये पाकिस्तानशी पुन्हा व्यापार सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे आता गेल्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमधील बंद असलेला व्यापार सुरु होण्याची चिन्हे होते. पाकिस्ताननेच 2019 साली हा व्यापार एकतर्फी बंद करण्याची घोषणा केली होती.

दरम्यान नुकतच पाकिस्तानच्या व्यापार मंत्रालयाने भारतातून कापूस आणि साखर आयातीला अनुमती द्यावी अशी शिफारस मंत्रिमंडळाकडे केली होती. मात्र यावेळी पंतप्रधान इम्रान खान यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत सध्याच्या वातावरणात आम्ही भारताशी व्यापारी संबंध ठेऊ इच्छित नाही अशी भूमिका घेतली आहे.

व्यापाराच्या या निर्णयाचा पकिस्तान सरकारने काश्मीरातील कलम 370 रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाशी संबंध जोडला आहे. हे कलम रद्द करण्याचा निर्णय भारत सरकार जो पर्यंत मागे घेत नाही तो पर्यंत भारताबरोबर कोणतेही व्यापारी संबंध ठेवता येणार नाहीत असे पाक सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!