नवी दिल्ली : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूका सुरु आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
दुसरीकडे राज्यासह देशात कोरोनाचा धोका पुन्हा एकदा वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील महाराष्ट्रातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. मात्र देशात सुरु असलेला निवडणूक प्रचार आणि नेत्यांच्या अजब विधानांमुळे परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे वेळोवेळी दिसून येते. असेच एक अजब विधान आसामचे आरोग्य मंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनी केलं आहे.
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क घालण्याची आवश्यकता नाही असं धक्कादायक विधान त्यांनी केल आहे. ‘केंद्र सरकारने कोरोना नियमावली जाहीर केली आहे. परंतु आसामचा विचार करता, इथे कोरोनाचा धोका नाही. त्यामुळे इथे भीती पसरवण्याचं कारण नाही असं सरमा म्हणाले.’
‘मास्क घालण्याची वेळ येईल तेव्हा मी लोकांना सांगेन. सध्या अर्थव्यवस्था बळकट करण्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मास्क घातले तर ब्युटी पार्लर कसे चालतील. त्यांचंही काम सुरू राहायला हवं.’ असं सरमा म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवडणूक आयोग’, ईव्हीएम मशीन प्रकरणावर राहुल गांधींचे दोन शब्दांत ट्विट
- आरसीबीच्या हुकूमी एक्क्याला कोरोनाची लागण
- कोरोनाशी लढा एकट्या सरकारचा नाही तर सर्व जनतेचा – उद्धव ठाकरे
- ‘कोणत्या दबावाखाली भाजप नेत्याची प्रचारबंदी 48 तासांऐवजी 24 तास केली ?’
- गांधीगिरी! आ.सुरेश धस यांनी केला विनामास्क फिरणाऱ्यांचा सत्कार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
