Share

नांदेड जिल्हा; कोरोना रुग्णांना लूटणाऱ्या खासगी लॅबला जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

Published On: 

नांदेड : जिह्यात कोरोना महामारीचा कहर वाढत आहे. वाढत्या कहरला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. या काळात माणुसकीचे उदाहरणे ही आपण पहिली आहेत, त्याच बरोबर समाजकंटक ही पहिले आहेत. अशीच एक घटना नांदेड येथे घडली. विविध चाचण्यांच्या माध्यमातून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट करणाऱ्या थायरोकेअर पॅथालॉजी लॅबोरेटरीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी लॅबच्या दोन जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

नांदेड शहर व जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे विविध खासगी लॅबवर तपासणीसाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक गर्दी करीत आहेत. त्याचा गैरफायदा घेत काही पॅथालॉजी लॅबोरेटरीतून रुग्णांची आर्थिक लूट केली जात असल्याचे प्रकार घडले आहेत. शुक्रवारी शहरातील डॉक्टर लेन भागातील थायरोकेअर पॅथालॉजी लॅबोरेटरीत आरटीपीसीआर चाचणीसाठी शासनाने केवळ ६०० रुपये दर निश्चित केलेले असताना रुग्णांच्या नातेवाईकांकडून त्यासाठी २ हजार रुपये घेतले गेले.

हा प्रकार काहींनी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांच्या कानावर घातल्यानंतर त्यांनी मनपा प्रशासनाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या पथकाने शुक्रवारी रात्री या लॅबवर धाड टाकली. या लॅबचे अभिलेखे तपासले असता त्यात रुग्णांकडून २ हजार रुपये फिस घेतल्याचे निष्पन्न झाले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!