Share

कधीतरी खरं बोला रे नाही तर लोकं तुमच्यावर शेण फेकून मारतील, निलेश राणेंचा मलिकांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून शहरी भागासह ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. कोरोनाचा रुग्णांचा वाढता आकडा लक्षात घेता चिंता व्यक्त केली जात आहे. सरकारकडून देखील राज्यातील काही भागामध्ये कडक निर्बंध लावण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी सवांद साधला. महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक होत असल्याने, लॉकडाऊनचा धोका टळलेला नाही असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या उद्रेकामुळे महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे. अशीच ररुग्णवाढ सुरु राहिली तर पुढील १५ दिवसांत हॉस्पिटले तुडुंब भरून जातील. असेही ते यावेळी म्हणाले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गेल्या दोन दिवसांत राज्यातील अनेक मान्यवरांशी चर्चा करत राज्यातील लॉकडाऊन लावायचा की निर्बंध कडक करायचे यावर चर्चा केली आहे. त्यानंतर आता याच पार्श्वभूमीवर आज दुपारी ३ वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्व मंत्री ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनाची परिस्थिती यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे.

या बैठकी आधीच राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी राज्यात लॉकडाऊन लागणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी अद्याप लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. ते तज्ज्ञांशी चर्चा करत आहेत. मात्र, राज्यात दिवसाला कोरोनाचे 50 हजार रुग्ण सापडल्यानंतरही लोकांना परिस्थितीचे सोयरंसुतक नाही, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

तर दुसरीकडे भाजपचे नेते त्यांचं राजकारण करत आहेत. लोकांचा जीव महत्त्वाचा की राजकारण हे त्यांना कळायलं हवं. मोदी थाळी वाजवा, मेणबत्ती लावा असं म्हणतात. भाजपवाल्यांना लोकांच्या जीवाशी देणघेणं नाही, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

नवाब मालिकांच्या या टीकेला माजी खासदार आणि भाजप नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘हा माणूस टोपिमास्टर आहे, चार दिवसापूर्वी लॉकडाऊन परवडणार नाही म्हणून बोंबलत होता. चार दिवसात लोकं अचानक बेफिकीर झाली? कधीतरी खरं बोला रे नाही तर लोकं तुमच्यावर शेण फेकून मारतील. असा टोला निलेश राणे यांनी लगावला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी लॉकडाऊन जनतेला आणि राज्याला परवडणारा नाही अशी रोखठोक भूमिका नवाब मलिक यांनी घेतली होती. तर आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरला आहे कि आता लॉकडाऊन नकोच, लॉकडाऊन हा पर्याय नाहीये सरकारने आरोग्य सुविधा वाढविण्यावर भर द्यावा. अस मलिक म्हणाले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!