🕒 1 min read
मुंबई : राज्यासह देशभरात गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यामुळे अनेकांना आपल्या जवळील व्यक्तींना गमवावं लागलं आहे. कोरोनाच्या थैमानामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाने अनेकांचा बळी घेतला. अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या लोकांना गमावलं. अशातच ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय मालिकेतील ज्येष्ठ अभिनेते हेमंत जोशी यांचे १९ मे ला कोरोनामुळे निधन झाले.
हेमंत जोशीं यांनी ‘जीव झाला येडा पिसा’ या मालिकेत ‘भावे’ ही भूमिका साकारली होती. हेमंत जोशी हे अत्यंत दिलखुलास स्वभावाचे होते. त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या सहकलाकारांना मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री सुमेधा दातार आणि इतर कलाकारांनी हेमंत जोशींच्या निधनावर दु:ख व्यक्त केले आहे.
https://www.instagram.com/p/CPGEU0XJ-2s/?utm_source=ig_web_copy_link
अभिनेत्री सुमेधा दातारने आपल्या इन्स्टाग्रामवर हेमंत यांचा फोटो शेअर करत भावुक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ लिहायला मनच धजत नाहीये. दिलखुलास हास्य ,ही एव्हरग्रीन पर्सनॅलिटी़ सतत हसतमुख व्यक्तिमत्त्व. कसे आहात विचारलं की स्टायलित उत्तर एकच ‘ऐश’… माझ्या आयुष्यातील पहिलं प्रोफेशनल रेकॉर्डिंग मी हेमंत जोशींबरोबर केलं, तिथपासून जीव झाला येडापिसा पर्यंतचा प्रवास…आणि काल अचानक भावे गेले … किती वेळ, अजूनही पटतच नाहीये जिथे कुठे असाल तिथे तुमच्या भाषेत ‘ऐश’ करा.’ हेमंत जोशी ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतही दिसले होते. तसेच त्यांनी ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे’, ‘टेंडल्या’, ‘बालगंधर्व’ अशा अनेक सिनेमांत काम केल आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराज, मोदींना आग्रा दरबारातील शिवशक्तीचा प्रत्यय पुन्हा दाखवण्याची वेळ आलीये!’
- ‘मोदी कशाचीही जबाबदारी घेत नाहीत’, भाजप खासदाराचा घरचा आहेर
- संचारबंदीत विनाकारण फिरणाऱ्या १७९ जणांवर गुन्हे दाखल
- ‘मुख्यमंत्री ठाकरेंचा दौरा म्हणजे लिपस्टिक दौरा’, नितेश राणेंची टीका
- ‘फोटोसेशन नव्हे तर मदतीसाठी आलोय’, रत्नागिरी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
